आवडत्या शिक्षकासाठी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेला ठोकले कुलूप!

शिक्षकांना परत पाठवणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार 


भंडारा : आवडत्या शिक्षकासाठी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. भंडारा शहराच्या शेजारी असलेल्या गणेशपुर ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलला कुलूप ठोकून शाळकरी विद्यार्थी, पालक, जिल्हा परिषद सदस्य आणि गावकरी मिळून ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. जोपर्यंत बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना परत पाठवणार नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार असल्याचा यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.


शून्य पटसंख्या असलेल्या या शाळेला गावकऱ्यांनी आणि जिल्हा परिषद चे शिक्षक चौधरी सर आणि घर सर यांनी मिळून नव्याने सुरू केली. आज या शाळेची पटसंख्या 110 वर पोहोचली आहे. शिक्षणाचा दर्जाही वाढल्याने बऱ्याच पालकांनी इंग्रजी शाळेतून मुलांचा प्रवेश या शाळेत करून घेतला. मात्र या शाळेतील शिक्षक चौधरी सर आणि घरत सर यांना पदोन्नती देऊन त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना पदोन्नती देण्यास हरकत नाही ती पदोन्नती या शाळेत रिक्त असलेल्या जागेवर द्या अशी मागणी पालकांनी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत शासनाने त्यांची बदली इतर ठिकाणी केल्याने पालक विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेला कुलूप ठोकले आहे आणि जोपर्यंत चौधरी सर आणि घरत सर परत या शाळेत येणार नाही तोपर्यंत ही शाळा सुरू होणार नाही आणि आम्ही असंच आंदोलन करून असं यावेळी आंदोलन कर्त्यानी सांगितले.

Comments
Add Comment

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा; मुंबई-कोल्हापूरदरम्यान 4 विशेष रेल्वे धावणार

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी जाण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या

Pune News: पुण्यात अन्न- औषध प्रशासनाची मोठी कारवाई, ऐन सणासुदीच्या काळात पनीर- खवा जप्त

पुणे: सणासुदीच्या काळामध्ये अन्न- औषध प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आलेलं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसह

Food Poising Case : खिचडी खाल्ली अन् मृत्यू ओढावला ! मुलाचा मृत्यू तर कुटुंबातील तिघांची मृत्यूशी झुंज सुरु; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं ?

Food Poising Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. खिचडी खाल्यानंतर एका

Pune Ganeshotsav : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात ‘या’ दिवसांमध्ये दारूविक्री बंद, आदेश जारी

पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून, पुणे शहरात बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Bhandara Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात; आयशर ट्रकला ट्रॅक्सची धडक, 8 मजुरांचा जागीच मृत्यू

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी