'One Country, One Election' : एक देश, एक निवडणूक ; मंजुरीसाठी सरकारला अग्निदिव्यातून जावे लागणार

दीपक मोहिते

नवी दिल्ली : " एक देश,एक निवडणूक," या प्रणालीला नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यावर दोन्ही सभागृहात मंजुरी मिळावी,यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.पण त्यांच्या या प्रयत्नांना प्रादेशिक पक्षाची साथ मिळेल,अशी शक्यता नाही. कारण ही प्रणाली प्रादेशिक पक्षाना मारक ठरणारी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे इंडिया गटानेही यावर विचार करण्यासाठी आपल्या घटक पक्षाची बैठक बोलावली आहे.
केंद्र सरकारने १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले.


या बैठकीत " एक देश,एक निवडणूक," या महत्वाच्या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी एकमताने स्विकारण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी होणारा प्रचंड खर्च,वेळेचा अपव्यय व कायदा सुव्यवस्थेवर पडणारा ताण,सरकारी कर्मचाऱ्यांना सतत निवडणुकीच्या कामात गुंतून राहणे व वारंवार लादण्यात येणाऱ्या आचारसंहितेचा विकासकामांवर होणारा परिणाम,लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती नेमली होती.


या समितीने आपला अहवाल नुकताच केंद्र सरकारला सादर केला होता.त्यावर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.त्यानंतर या समितीच्या सर्व शिफारशी मंत्रिमंडळाने एकमताने स्विकारल्या.एकत्रीतपणे निवडणुका झाल्यास सरकारी तिजोरीवरील भार कमी होईल,तसेच सरकारी कामकाजात निर्माण होणारे अडथळे दूर होतील,असे मत सर्वच मंत्र्यानी मांडले.त्यानंतर या समितीच्या सर्व शिफारशी स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आला.


मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय आता दोन्ही सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.लोकसभेत रालोआ बहुमत असल्यामुळे या सभागृहात याविषयीचे विधेयक मंजूर होईल,पण राज्यसभेत रालोआला काठावरचे बहुमत असल्यामुळे कदाचित भाजपला रालोआत घटक पक्ष असलेल्या प्रादेशिक पक्षाची मनधरणी करावी लागणार आहे.कारण या प्रणालीला जर मंजुरी मिळाली तर प्रादेशिक पक्षांवर संक्रात येईल,अशी भिती प्रादेशिक पक्षाना वाटत आहे.त्यामुळे राज्यसभेत सरकारला अग्निदिव्यातून जावे लागणार आहे.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या भाजपा महिला आमदाराची प्रकृती खालावली, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू; नेमकं काय घडलं?

कोलकाता: पश्चिम बंगालमधील भाजपाच्या महिला आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर एका खासगी

Hyderabad News : हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोटांची धमकी; 300 जणांना ठार मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क

Hyderabad News: लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या नावाने कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीनंतर हैदराबाद पोलिसांना

Delhi News : 55 लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली; दिल्ली पोलिसांनी सहा दिवसांत शोधून मालकाला केली परत

दिल्ली : दिल्लीतील काश्मिरी गेट आंतरराज्य बस स्थानकावर (ISBT) हरवलेली सुमारे 55 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या

Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक

Rajasthan Viral News : 'बडा अजब आदमी है!' बायकोशी भांडण झालं अन् 500 रुपयांच्या नोटांचा ढीग पेटवला; व्हिडिओ व्हायरल

Viral News: राजस्थानमधील एका कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर