Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. बेंगळुरू येथील एका दृष्टिहीन विद्यार्थ्याने अशा विवाहांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच जनजगृती वाढवण्याचे आवाहनही केले आहे. न्यायालयाने केंद्र सरकारकडून यासंदर्भात उत्तर मागितले आहे, तसेच हे स्पष्ट केले आहे की, या विषयावर कायदा करण्याचा अधिकार विधिमंडळाच्या अखत्यारीत येतो. परंतु सध्या तरी, देशभर अशी कोणतीही बंदी लागू करण्यात आलेली नाही.


तसेच सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने असेही नमूद केले की, न्यायालय 'रक्ताच्या नात्यातील विवाहांचे' नियमन करू शकत नाही.


बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात अधिकतर नात्यात मामाच्या मुलीशी विवाह केला जातो. किंवा इतर रक्ताच्या नातेसंबंधनात विवाह केला जातो. ही विविह पद्धत प्रतिबंधित कलेची जाऊ शकते का? सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेमुळे या प्रश्नावर नवीन कायदेशीर चर्चा सुरू झाली आहे. या पद्धतीमुळे पुढच्या पिढीच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेता, याचिकाकर्त्याने या विषयावर कायदा करण्याची मागणी केली आहे. बेंगळुरू येथील एका दृष्टिहीन विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. तसेच त्याने त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक जोखमींबाबत जनजागृती मोहीम राबवण्याची विनंती देखील केली आहे.






याचिकाकर्त्याचा यासंदर्भात असे म्हणणे आहे की, रक्ताच्या जवळच्या नातेसंबंधांतील विवाहामुळे मुलांमध्ये काही अनुवांशिक आजार आणि जन्मजात दोष (congenital disorders) निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळे अंधत्व, ऐकण्यातील दोष, जन्मजात शारीरिक व्यंग आणि बालमृत्यू यांसारख्या संभाव्य आरोग्यविषयक धोक्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, संभाव्य आरोग्य धोके आहेत याचा अर्थ असा नाही की, अशा विवाहांमधून जन्मलेल्या प्रत्येक मुलाला नक्कीच काही आजार किंवा दोष असतीलच.

महाराष्ट्रातही मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा दिसून येते. विशेषतः विदर्भ प्रदेशाच्या संदर्भात या प्रथेवर बऱ्यापैकी संशोधन उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील विदर्भ भागात मामाच्या मुलीशी विवाह करण्याची परंपरा जास्त प्रमाणात आहे. एका प्रादेशिक अभ्यासानुसार, या भागात नातेवाईकांमध्ये होणाऱ्या विवाहांपैकी 74.04 % विवाह हे मामाच्या मुलीशी झालेले आहेत, ही आकडेवारी विदर्भात या प्रथेचे प्रमाण किती जास्त आहे, हे दाखवते.

Comments
Add Comment

Rajasthan Viral News : 'बडा अजब आदमी है!' बायकोशी भांडण झालं अन् 500 रुपयांच्या नोटांचा ढीग पेटवला; व्हिडिओ व्हायरल

Viral News: राजस्थानमधील एका कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

Agniveer : अग्निवीरांसाठी दिलासादायक निर्णय; दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाहाला परवानगी

Defence News: अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांना दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाह

Haryana Dowry Case: ९.५ लाखांची कार नाकारली, १३ लाखांची ब्रेझा मागितली; कार न मिळाल्याने लग्न मोडलं

हरियाणाच्या सोनिपतमध्ये नवरदेवाने मारुती ब्रेझा कारची मागणी पूर्ण न झाल्याने ठरलेलं लग्न मोडल्याची घटना घडली.

हाय स्पीड बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत आलं? कधीपासून येणार प्रवाशांच्या सेवेत; रेल्वेमंत्र्यांनी दिली अपडेट

[caption id="attachment_1077702" align="aligncenter" width="800"] रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली

दिग्गज राजकारण्यांच्या उपस्थितीत Anirudh- Kavya Maran चा शाही रिसेप्शन सोहळा; पाहा Photos

[caption id="attachment_1077649" align="aligncenter" width="800"] लोकप्रिय गायक- संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह मालकिण- सीईओ