माथेरान, कर्जत मार्गावर नवीन मिनीबस केव्हा उपलब्ध होणार?

नवीन बस उपलब्ध नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी


माथेरान : माथेरानसाठी २००८ मध्ये कर्जत नेरळ मार्गे माथेरान मिनीबस सेवा सुरू होऊन जवळपास पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी असणाऱ्या मिनीबस जुन्या झाल्याने अनेकदा घाटरस्त्यात बंद पडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात पायपीट करावी लागते. काही महिन्यांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी नवीन बस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप या कर्जत - माथेरान मार्गावर नवीन बस उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.


स्थानिकांनी अनेकदा संघर्षाला सामोरे जाऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा यासाठी कठोर परिश्रम घेऊन ही मिनीबसची सेवा उपलब्ध करून घेतली होती. या मार्गावर दोन बसेस देण्यात आल्या आहेत; परंतु यातील एक बस कर्जत पनवेल अशी फेऱ्या मारत असून एक बस कर्जत नेरळ मार्गे माथेरान अशा फेऱ्या करत आहे. घाट रस्त्यात ही बस वारंवार बंद पडत असते. यामुळे शालेय विद्यार्थी, व्यापारी वर्ग त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मिनीबसच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातून सर्वाधिक भरघोस उत्पन्न मिळत असताना देखील परिवहन महामंडळ इकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न अनेकांमधून उपस्थित केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या मिनीबस या मार्गावर सुरू व्हाव्यात यासाठी अनेकदा उपोषणे त्याचप्रमाणे स्थानिकांनी, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निवेदने कर्जत आगारात त्याचप्रमाणे वरिष्ठांना सुध्दा दिलेली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या आहेत; परंतु अद्याप इथे नव्याने बसेस सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिकांमधून याबाबत प्रचंड नाराजी दिसून येत आहे.



कर्जत तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी एकमेव बस


नेरळ, कर्जत अथवा बदलापूर या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिनीबस सेवा ही जीवनवाहिनी बनली आहे. आजवर शेकडो विद्यार्थ्यांनी परिसरात जाऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्याने ही मुले विविध क्षेत्रात,व्यवसायात, नोकरीत चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत तर नियमितपणे प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला स्वस्त आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही सेवा खूपच सोयीस्कर बनलेली आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी ही एकमेव बस असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Prahaar Marathi News Live, 23 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 23 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Domestic Violence case: 20 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; तीन दिवस अर्ध्या चपातीवर ठेवल्याचा आरोप

लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून

Sanjay Rathod : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे नियोजन; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग- मंत्री संजय राठोड

मुंबई : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

राज्यातील 3,832 अंगणवाड्या होणार स्मार्ट; मुलांना मिळणार आधुनिक शिक्षण आणि सुविधा

राज्यातील अंगणवाड्यांचं चित्र आता बदलणार आहे. अंगणवाडी केंद्रात मिळणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, आठ लाखांची फसवणूक; 13 महिलांना गंडा घालणारा आरोपी दुबईत जेरबंद!

लग्नाचे स्वप्न दाखवून महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायची, असा धक्कादायक