राज्यातील 3,832 अंगणवाड्या होणार स्मार्ट; मुलांना मिळणार आधुनिक शिक्षण आणि सुविधा

राज्यातील अंगणवाड्यांचं चित्र आता बदलणार आहे. अंगणवाडी केंद्रात मिळणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची भर घालत ३,८३२ अंगणवाड्यांना 'स्मार्ट अंगणवाडी' करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षण दिलं जातं. तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पोषण व आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात. ही केंद्रं अधिक आकर्षक, सुरक्षित आणि आनंददायी व्हावीत, यासाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबवली जात आहे. शासकीय जागेत असलेल्या आणि जिथे वीज जोडणी उपलब्ध आहे, अशा केंद्रांचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. अशा ३,८३२ केंद्रांना स्मार्ट करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.


स्मार्ट किटमध्ये काय-काय मिळणार?


या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांना स्मार्ट किट दिलं जाणार आहे. यामध्ये ई-लर्निंगसाठी लागणारं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असणार आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळातून, गाणी, गोष्टी आणि चित्रांमधून शिकणं अधिक सोपं होणार आहे. याशिवाय स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिनची सुविधा दिली जाणार आहे. अंगणवाडी इमारतीला रंगरंगोटी केली जाणार आहे. इमारतीची आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्वयंपाकघराचं आधुनिकीकरणही यामध्ये समाविष्ट आहे.






टप्प्याटप्प्याने काम


अंगणवाडी केंद्रातील सुविधा आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती केली जात आहे. मुलांच्या पोषण, आरोग्य आणि सुरुवातीच्या शिक्षणासाठी अधिक गुणवत्तापूर्ण वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं. पूर्वी अंगणवाडी म्हणजे फक्त पोषण आहाराचं केंद्र असं चित्र होतं. आता मात्र ते मुलांच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र बनत आहे. स्मार्ट अंगणवाडीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब कुटुंबातील मुलांनाही चांगल्या सुविधा मिळणार आहेत. शिक्षणाची गोडी लहानपणापासूनच लागावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, आठ लाखांची फसवणूक; 13 महिलांना गंडा घालणारा आरोपी दुबईत जेरबंद!

लग्नाचे स्वप्न दाखवून महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायची, असा धक्कादायक

Pune Cyber Crime: पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक! निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एटीएस

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुटे यांचं निधन; धनगर आरक्षणासाठी लढणारा नेता काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रातील भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुटे यांचं रविवारी (२२ नोव्हेंबर) निधन झालं. दिल्लीतील एम्स

Prahaar Marathi News Live, 22 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 22 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Shocking crime news Maharashtra: ज्याच्यासोबत बांधली लग्नगाठ, त्याच्याच हत्येचा कट! पत्नीच्या कृत्याने परिसर हादरला

लग्नाला अवघे सहा महिने झाले असतानाच एका तरुणाचा संसार दुर्दैवीरीत्या संपल्याची धक्कादायक घटना धाराशिव

Pune Camp 8 hotels license suspended : पुणेकरांनो सावधान! बाहेर खाताय ? कॅम्पमधील ८ प्रसिद्ध हॉटेल्सवर FDA ची मोठी कारवाई!

पुणे : पुणे शहरातील खवय्यांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महापालिकेने