राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याने सगळीकडे दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुणेसह विदर्भातही गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. बुधवारी झालेल्या पावसाने शहरी भागात वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहेत.


राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण करत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. यामुळे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.


वायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सोमवारपासून सुरू झाला आहे. यंदा सलग १४ व्या दिवशी परतीचा प्रवास विलंबाने सुरू झाला. सामान्यपणे १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू झाला आहे.


राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी बादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातील काही जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.


मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, घाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली,नांदेड या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Domestic Violence case: 20 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; तीन दिवस अर्ध्या चपातीवर ठेवल्याचा आरोप

लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून

Sanjay Rathod : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे नियोजन; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग- मंत्री संजय राठोड

मुंबई : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

राज्यातील 3,832 अंगणवाड्या होणार स्मार्ट; मुलांना मिळणार आधुनिक शिक्षण आणि सुविधा

राज्यातील अंगणवाड्यांचं चित्र आता बदलणार आहे. अंगणवाडी केंद्रात मिळणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, आठ लाखांची फसवणूक; 13 महिलांना गंडा घालणारा आरोपी दुबईत जेरबंद!

लग्नाचे स्वप्न दाखवून महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायची, असा धक्कादायक

Pune Cyber Crime: पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक! निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एटीएस