सांगलीत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू!

सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश असून, गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये पारसनाथ वनमोरे (४०), त्यांचा मुलगा शाहीराज (१२), आणि प्रदीप वनमोरे (३५) यांचा समावेश आहे. आणखी एक जण, हेमंत वनमोरे (२५), या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


आज सकाळी शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पारसनाथ वनमोरे यांना शेतात तुटलेली वीजवाहक तार पडल्यामुळे शॉक लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. वडिलांना शोधण्यासाठी गेलेला मुलगा शाहीराजही त्या तारेच्या संपर्कात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, प्रदीप वनमोरे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील विजेचा धक्का बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला.


ही दुर्दैवी घटना संपूर्ण म्हैसाळ गावासाठी धक्कादायक ठरली असून ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.


मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Domestic Violence case: 20 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; तीन दिवस अर्ध्या चपातीवर ठेवल्याचा आरोप

लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून

Sanjay Rathod : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे नियोजन; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग- मंत्री संजय राठोड

मुंबई : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

राज्यातील 3,832 अंगणवाड्या होणार स्मार्ट; मुलांना मिळणार आधुनिक शिक्षण आणि सुविधा

राज्यातील अंगणवाड्यांचं चित्र आता बदलणार आहे. अंगणवाडी केंद्रात मिळणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, आठ लाखांची फसवणूक; 13 महिलांना गंडा घालणारा आरोपी दुबईत जेरबंद!

लग्नाचे स्वप्न दाखवून महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायची, असा धक्कादायक

Pune Cyber Crime: पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक! निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एटीएस