पोलीस चकमकीत ३० नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात आज, शुक्रवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झालेत. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. दरम्यान ही चकमक अजूनही सुरू असून मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.


नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नक्षलवादी लपून बसल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नारायणपूर आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचनाक पोलिस पथकावर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला सतर्क असलेल्या पोलिस दलाने तत्काळ प्रत्युत्तर दिले. यात काही नक्षलवादी ठार झाले असून पोलिसांना आतापर्यंत ३० मृतदेह गवसले आहेत. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यानंतर ते क्षेत्र सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी आणि उर्वरित नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबद्दल आणखी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ऑपरेशन सुरू ठेवत असल्याचे देखील एका पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.


छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात परत येण्याची संधी दिली जात आहे. एवढे प्रयत्न करूनही जे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांचा खात्मा केला जात आहे.


विशेष म्हणजे, दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात विविध चकमकीत आतापर्यंत सुरक्षा दलांनी १८१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना नक्षलवादाचा नायनाट करण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. भारत मार्च २०२६ पर्यंत डाव्यांच्या कट्टरवादापासून मुक्त होईल. या धोक्याविरुद्ध अखेरची लढाई सुरू करण्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे, असे शाह म्हणाले होते. एवढेच नाही, तर त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडण्याचे आवाहनही केले होते.

Comments
Add Comment

Hyderabad News : हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोटांची धमकी; 300 जणांना ठार मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क

Hyderabad News: लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या नावाने कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीनंतर हैदराबाद पोलिसांना

Delhi News : 55 लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली; दिल्ली पोलिसांनी सहा दिवसांत शोधून मालकाला केली परत

दिल्ली : दिल्लीतील काश्मिरी गेट आंतरराज्य बस स्थानकावर (ISBT) हरवलेली सुमारे 55 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या

Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक

Rajasthan Viral News : 'बडा अजब आदमी है!' बायकोशी भांडण झालं अन् 500 रुपयांच्या नोटांचा ढीग पेटवला; व्हिडिओ व्हायरल

Viral News: राजस्थानमधील एका कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

Agniveer : अग्निवीरांसाठी दिलासादायक निर्णय; दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाहाला परवानगी

Defence News: अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांना दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाह