दंड ठोठावला तरीही दादा, भाऊ, काका, मामांना लगाम लावण्यात पोलिसांना अपयश!

अमरावती : अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत सुमारे २८०२ वाहनधारकांना ई-चालानने दंड ठोठावला. तरीही 'दादा', 'मामा', 'काका', 'बॉस', 'भाऊ' अशा फॅन्सी नंबर प्लेटला लगाम बसलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाहतूक पोलीस फॅन्सी नंबर प्लेटबाबत मोहीम हाती घेणार आहेत.


शहरातील काही वाहनधारक, विशेषतः राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या मोटारसायकल, कारवर 'दादा', 'मामा' नंबरप्लेट वापरतात. शहरातील साखळी चोरीच्या घटनांमध्येही बरेचदा दुचाकीवरील नंबर चटकन ओळखू येऊ नये म्हणून कलाकुसर करून नंबर टाकण्यात येत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.


त्यामुळे वाहतूक शाखेने यंदा २८०० च्या आसपास वाहनधारकांवर कारवाई करत ५०० पेक्षा अधिक वाहनांच्या फॅन्सी नंबर प्लेट काढून टाकल्या. 'नो- पार्किंग'मधून उचलून आणलेल्या गाड्यांमध्येदेखील अशी गाडी आढळल्यास त्यावरही कारवाई करण्यात येत आहे.


शहरातील अनेक दुचाकींच्या मागील नंबर प्लेटवर 'बॉस', 'भाई', 'दादा', 'काका', 'मामा' अशी अक्षरे दिसतात. ही काही नातेवाइकांची नावे नाहीत, तर या आहेत फॅन्सी नंबर प्लेट. फटफट आवाज करत असलेली बुलेट आणि तिच्यावर असलेली अशी नंबरप्लेट हे चित्र तुम्ही अनेकदा पाहिले असेल.


सध्या फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड आले आहे. नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारचे सांकेतिक चिन्ह किंवा तत्सम गोष्टी लावणे नियमांच्या विरोधात आहे. त्याला दंडही ठोठावला जातो. मात्र, त्यानंतरही ते फॅड कमी झालेले नाही.

Comments
Add Comment

Aadhaar Card News: उद्यापासून सर्व प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक, वाचा सविस्तर...

मुंबई: स्थावर मालमत्तेशी संबंधित दस्तनोंदणीतील फसवणुकीला आळा घालण्यासाठी आता कोणत्याही दस्त नोंदणीसाठी

MPSC विद्यार्थ्यांचे 2 ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलन

शक्तीपीठ महामार्गासाठी १२९ गावांत जमीन मोजणी पूर्ण, ४०९ गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया; २६५ गावांत शेतकऱ्यांशी संवाद सुरू

मुंबई : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी असलेल्या संयुक्त जमीन मोजणीला १३

माजी अग्निवीरांना राज्यातील गणवेशधारी पदांसाठी विविध सवलती - लेखी, शारीरिक चाचण्यांतून सूट; वयोमर्यादेत चार वर्षांपर्यंत शिथिलता

मुंबई : सैन्यदलातील चार वर्षांची सेवा पूर्ण करून सेवामुक्त होणाऱ्या महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना

Gulabrao Patil : राज्यात तीन टप्प्यांत पाणीटंचाईचे नियोजन, १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्हानिहाय आराखडा सादर करण्याचे निर्देश

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य टंचाईचा

Nitesh Rane : दुष्काळात शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मच्छिमारांनाही देणार; मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

२०२८ पासून मुंबईत ‘वॉटर मेट्रो’ कार्यान्वित करणार मुंबई : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास