बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार माजी आमदार सिताराम दळवी यांचे निधन

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार तथा माजी आमदार सिताराम दळवी (Sitaram Dalvi) यांचे आज, शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले, ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.


अंधेरी विधानसभा मतदार संघातून १९९५ ला शिवसेनेच्‍या तिकिटावर ते विजयी झाले होते. त्‍यापुर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक म्‍हणून ते विजयी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्‍ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते.


शिवसेनेच्‍या सुरुवातीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या अनेक आंदोलनात त्‍यांचा सहभाग होता.


कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील आरोस हे त्‍यांचे मुळ गाव असून त्‍यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्‍यांचे अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होते. मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अॅड. प्रतिमा आशिष शेलार, सुना नातवंडे असा परिवार आहे.


आज संध्याकाळी ६.३० वाजता त्यांच्यावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा संदिप दळवी यांनी त्यांना अग्नी दिला यावेळी जावई मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांच्यासह खासदार रवींद्र वायकर, शिवसेना (उबाठा सेना) आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू, पराग अळवणी, माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी शिवराम दळवी, अमोल किर्तीकर, जितेंद्र जनावळे, हाजी अराफत शेख, जयेंद्र साळगावकर, विनोद शेलार मुरजी पटेल, वर्षा विनोद तावडे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.

Comments
Add Comment

Thane Water Cut: पुण्यानंतर आता ठाण्यातही पाणीकपात, 24 तास राहणार पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका?

ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. MIDC मार्फत महापालिका क्षेत्रात होणार्‍या परिसरात पाणी पुरवठा बंद

JVPD उड्डाणपुलाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून पाहणी, पूल केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार?

मुंबई: मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गडद होत चालला आहे. केव्हाही शहरामध्ये प्रवास करा,

ठाणे जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार, स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अण्णा बनसोडे यांचे निर्देश...

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर

'फ्लेक्समुक्त मुंबई' अभियानासाठी महापौरांची धडाकेबाज सुरुवात, घाटकोपरमध्येच अनधिकृत बॅनर हटवत केला मोहिमेचा श्रीगणेशा

मुंबई: मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनरचे प्रमाण वाढले आहे. चौका- चौकात आणि प्रत्येक ठिकाणी बॅनरचे

Eknath Shinde : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय; शिवसेनेचा सचिन सानप यांना पाठिंबा

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल राज्य मंत्रिमंडळाकडून अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी मांडला प्रस्ताव

महाराष्ट्रातील १२ लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांसह विविध योजनांचा गौरव मुंबई : घटनात्मक पदावर राहून सलग २५