Mohamed Muizzu India Visit : अखेर भारत-मालदीवचा वाद समाप्त; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य

सध्या मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, आज मुइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. हैदराबादमधील हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान, मुइज्जू आणि पीएम मोदी यांनी मालदीवमधील हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी रुपे कार्डद्वारे पेमेंटही मालदीवमध्ये सुरू करण्यात आले. मोदी आणि मुइज्जू यांनी पहिला व्यवहार केला.



भारत- मालदीवचा हा सर्वात जवळचा आणि शेजारी मित्र


दोन्ही नेत्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भारत आणि मालदीवमधील संबंध शतकानुशतके जुने आहेत. मालदीवचा भारत हा सर्वात जवळचा आणि शेजारी मित्र आहे. आमच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे. आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. एकता हार्बर प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे. हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी आम्ही एकत्र काम करू."



$४०० मिलियन चलन विनिमय करार


मालदीवमध्ये सुरू असलेल्या भारतीय प्रकल्पांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, "आज परस्पर सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी दृष्टीकोन आम्ही स्वीकारला आहे. आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू विकास आहे आणि आम्ही नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिल आहे. आज ४०० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या चलन स्वॅप करारावर मालदीवच्या आवश्यकतेनुसार स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारत आणि मालदीव मुक्त व्यापार करारावरदेखील चर्चा सुरू आहेत. आम्ही मालदीवमधलया पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तयार आहोत. सामाजिक गृहनिर्माण युनिट्स आज भारताच्या सहकार्याने बांधलेल्या ७०० हून अधिक सुपूर्द करण्यात आल्या आहेत."



आपला शेजारी म्हणून भारताने नेहमीच आपली जबाबदारी पार पाडली : पंतप्रधान


पीएम मोदी म्हणाले, "आमच्या नेबरहुड फर्स्ट धोरणात आणि "सागर" व्हिजनमध्ये मालदीवचेही महत्त्वाचे स्थान आहे. मालदीवसाठी भारताने नेहमीच प्रथम प्रतिसादाची भूमिका बजावली आहे. मालदीवच्या लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करणे असो, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिण्याचे पाणी पुरवणे असो किंवा कोविडच्या काळात लस पुरवणे असो, आपला शेजारी म्हणून भारताने नेहमीच आपली महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे."





मोदींना मुइज्जूचे मालदीवला दौऱ्याचे निमंत्रण


दरम्यान, यावेळी पीएम मोदींना मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांनी मालदीव दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले, "आमच्या नवीन सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंटमध्ये विकास, सागरी सुरक्षा, व्यापार भागीदारी, ऊर्जा प्रकल्प, आरोग्य इत्यादींचा समावेश आहे. मी मालदीव भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करू इच्छितो. मालदीवच्या गरजेच्या वेळी भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. मालदीवला दिलेल्या मदतीबद्दल, विशेषत: अलीकडीच्या अर्थसंकल्पीय मदतीबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि सरकारचे खूप खूप आभार मानतो."

Comments
Add Comment

Hyderabad News : हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोटांची धमकी; 300 जणांना ठार मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क

Hyderabad News: लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या नावाने कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीनंतर हैदराबाद पोलिसांना

Delhi News : 55 लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली; दिल्ली पोलिसांनी सहा दिवसांत शोधून मालकाला केली परत

दिल्ली : दिल्लीतील काश्मिरी गेट आंतरराज्य बस स्थानकावर (ISBT) हरवलेली सुमारे 55 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या

Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक

Rajasthan Viral News : 'बडा अजब आदमी है!' बायकोशी भांडण झालं अन् 500 रुपयांच्या नोटांचा ढीग पेटवला; व्हिडिओ व्हायरल

Viral News: राजस्थानमधील एका कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

Agniveer : अग्निवीरांसाठी दिलासादायक निर्णय; दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाहाला परवानगी

Defence News: अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांना दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाह