हरियाणा, जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी आज मतमोजणी

हरियाणा/जम्मू : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झाले. यानंतर आता या दोन्ही निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहे. या निकालासाठी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे.


हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.


हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी निवडणूक पार पडल्यानंतर आता ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निकालासाठी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता हरियाणातील नागरिकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.


८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर जवळपास दुपारपर्यंत जम्मू- काश्मीर आणि हरियाणात कोणते सरकार येईल? याचे चित्र स्पष्ट होईल. या निकालाचे अपडेट तुम्हाला तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in अधिकृत संकेतस्थळावरही निकालाचे अपडेट मिळतील. या बरोबरच व्होटर हेल्पलाइन ॲपवरही तुम्हाला अपडेट मिळू शकतील.

Comments
Add Comment

Flydubai Incident : ओमानी पायलटचे चाैकशीत हादरवणारे खुलासे, म्हणाला जुलै महिन्यातच हल्ला घडवून आणणार होतो पण...

Flydubai Incident : फ्लायदुबईच्या FZ1073 विमानातील धक्कादायक घटनेच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. दुबईहून तेल अवीवकडे

Indigo Flight : ऐन सणासुदीत विमान प्रवास महागणार; इंडिगोने इंधन शुल्कात केली मोठी वाढ

मुंबई : सणासुदीच्या काळात विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात आता वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील

Bullet Train News : बुलेट ट्रेन प्रकल्पाची मोठी झेप : साबरमती नदीवर उभारला ४८० मीटर लांब अन् ३६ मीटर उंच भव्य पूल

अहमदाबाद : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahemdabad Bullet Train)  प्रकल्पाच्या कामाला वेगाने गती मिळत असून, या

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मोठं यश; साबरमती नदीवरील 12 मजली उंचीचा पूल तयार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अहमदाबादमधील साबरमती नदीवर

Vivo V80 Phone: 7200mAh दमदार बॅटरी, 144Hz डिस्प्लेसह विवोचा नवा 5G फोन येतोय; भारतात केव्हा लाँच होणार?

मुंबई: जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर, थांबा... Vivo कंपनीकडून V सीरीजमधील एक नवा कोरा मोबाईल लाँच

कर्तव्य, धैर्य अन् त्याग! फ्लायदुबई घटनेनंतर उजळल्या नीरजा भानोत यांच्या शौर्याच्या आठवणी

बुधवारी (३० सप्टेंबर २०२६) फ्लायदुबई FZ1073 विमानात झालेला थरार कोणीही विसरू शकत नाही. विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार