काँग्रेसचे आरोप तथ्यहिन, बेजबाबदार - निवडणूक आयोग

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. परंतु, नंतर काही तासात भाजपने आघाडी घेत तब्बल ४८ जागा पटकावल्या. यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाची वेबसाईट संथ असून निकाल अपडेट करण्यास उशिर करीत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आरोप तथ्यहिन आणि बेजबाबदार असल्याचे म्हंटले आहे.


हरियाणा मतमोजणीचे चित्र पालटल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकालाचे अपडेट करण्यास उशीर होत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोग अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्या या आरोपांना मिनिट-टू-मिनिट डेटा अपडेटसह प्रत्युत्तर दिले. ईसीआयने म्हटले आहे की, 'लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार होते त्या दिवशी ४ जून रोजी देखील काँग्रेसने असेच आरोप केले होते. आयोगाला हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे आढळून आले आणि निवडणूक आचार नियमांच्या नियम ६० अन्वये पूर्वनिर्धारित मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होते, असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी मतमोजणीवर सतत लक्ष ठेवतात.निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हरियाणा निवडणूक निकालाचा डेटा अपडेट करण्यात विलंब केल्याच्या आरोपावरून आयोगाने सांगितले की, कायदेशीर तरतुदींनुसार, प्रत्येक जागेवर पडलेल्या मतांची मोजणी तेथे निवडणूक लढविणारे उमेदवार आणि पक्षांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत केली जाते. डेटा अपडेट करण्यात उशीर झाल्याच्या निराधार आरोपांबाबत आम्हाला कोणताही पुरावा सापडलेला नाही.


जयराम रमेश यांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल प्रत्येक ५ मिनिटांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपडेट केले जात होते. मतमोजणीच्या सुमारे २५ फेऱ्या झाल्या आणि मतमोजणीची प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर पाच मिनिटांत डेटा वेबसाइटवर अपलोड झाला. जयराम रमेश यांचे आरोप बेजबाबदार, तथ्यहीन असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने फेटाळून लावले.

Comments
Add Comment

Hyderabad News : हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोटांची धमकी; 300 जणांना ठार मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क

Hyderabad News: लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या नावाने कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीनंतर हैदराबाद पोलिसांना

Delhi News : 55 लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली; दिल्ली पोलिसांनी सहा दिवसांत शोधून मालकाला केली परत

दिल्ली : दिल्लीतील काश्मिरी गेट आंतरराज्य बस स्थानकावर (ISBT) हरवलेली सुमारे 55 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या

Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक

Rajasthan Viral News : 'बडा अजब आदमी है!' बायकोशी भांडण झालं अन् 500 रुपयांच्या नोटांचा ढीग पेटवला; व्हिडिओ व्हायरल

Viral News: राजस्थानमधील एका कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

Agniveer : अग्निवीरांसाठी दिलासादायक निर्णय; दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाहाला परवानगी

Defence News: अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांना दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाह