दस-याची खूशखबर! देशातील गरिबांना डिसेंबर २०२८ पर्यंत मोफत धान्य देणार!

नवी दिल्ली : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने (Modi Government) देशातील करोडो गरिबांसाठी डिसेंबर २०२८ पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. आजच्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) अनेक योजनांना देखील ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


मंत्रिमंडळाने जुलै २०२४ ते डिसेंबर २०२८ पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी लागणारा १७,०८२ कोटी रुपये खर्च केंद्र सरकार करणार आहे. विकासाला चालना देणे आणि पोषण सुरक्षा वाढवणे हा सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.


केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि.१०) अन्न कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत १७,०८२ कोटी रुपयांच्या बजेटसह पौष्टिक तांदळाचा मोफत पुरवठा २०२८ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेले फोर्टिफाइड तांदूळ अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि लोकांमधील सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. मोफत फोर्टिफाइड तांदूळ पुरवठ्यासाठी एकूण १७,०८२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा संपूर्ण खर्च पूर्णपणे केंद्र सरकार करणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.


दरम्यान, मोफत तांदूळ वाटप निर्णयाशिवाय केंदाच्या कॅबिनेटमध्ये अन्य महत्त्वपूर्ण निर्णयांनाही मंजुरी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील नव्या रस्ते बांधणीस परवानगी देण्यात आली आहे. या भागात २,२८० किमीचे रस्ते बांधले जातील, ज्यासाठी ४,४०६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.


याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करणे आणि जगातील सर्वात मोठे सागरी वारसा संकुल तयार करणे हा यामागचा उद्देश असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Google DeepMind AlphaGenome Atlas : प्रथिनांच्या रचनेनंतर आता मानवी जनुकाचे रहस्य उलगडणार; गुगल डीपमाइंडचे 'अल्फाजीनोम ॲटलास' लाँच

नवी दिल्ली : सुमारे आठ वर्षांपूर्वी गुगलच्या 'डीपमाइंड' (Deepmind) या संशोधन संस्थेने जीवशास्त्राच्या गूढ जगाचा अभ्यास

Gaurav Bhatia : CJP ला मोठा झटका! AI जनरेटेड फेक फोटो भोवला; भाजपच्या गौरव भाटियांचा २ कोटींचा मानहानीचा खटला!

नवी दिल्ली : युवा आणि 'Gen Z' राजकारणाचा दावा करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Chockroach Janta Party) अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

BRICS 2026 : भारत आणि चीन संबंध : तणाव कमी होतोय, पण...ब्रिक्स परिषदेत मोदी-शी जिनपिंग भेटीकडे जगाचे लक्ष!

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) या आशियातील दोन मोठ्या देशांमधील बिघडलेले संबंध हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे

Apple Mega Event 2026 : आज रात्री iPhone 18 Pro आणि पहिल्या फोल्डेबल iPhone Duo वरून अखेर पडदा उठणार ?

कुपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथील प्रसिद्ध 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये ॲपलच्या भव्य सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे.

Ujjain : रस्ता रुंदीकरणासाठी मंदिर हटवलं पण ‘खडे हनुमान’ इंचभरही हलले नाहीत ! मूर्ती हलवताना तंत्रज्ञानही ठरलं अपयशी

Ujjain : एकीकडे २०२८ च्या सिंहस्थ महाकुंभाची जोरदार तयारी, रस्ता रुंदीकरणासाठी मंदिर हटवण्याचं काम सुरू पण

Amazon Food Safety Raid : ॲमेझॉन आणि इन्स्टामार्टला मोठा दणका! बंगळुरूमध्ये अन्नसुरक्षा विभागाची धाड; १.३८ कोटींचा माल जप्त!

बंगळुरू : बंगळुरू शहरात (Bengluru News) अन्न आणि औषध प्रशासनाने ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स (Online Delivery Platfort) आणि त्यांच्या