धक्कादायक! पोलीस उपायुक्तांच्या एकुलत्या एका मुलाने केली आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : 'मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे. मी जीवनाचा आनंद घेतला आहे, लव्ह यू बोथ,' असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


साहिल शीलवंत नांदेडकर (वय १७) असे या मृत मुलाचे नाव आहे. त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


साहिल बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. १२ ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी दसरा साजरा केला. साहिलही उत्साहाने त्यात सहभागी झाला होता. रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत त्याने गप्पा मारल्या. त्यानंतर सर्वजण झोपी गेल्यावर त्याने गळफास घेतला.


नेहमीप्रमाणे उपायुक्त नांदेडकर हे सकाळी सहा वाजता वॉकिंगला जाण्यासाठी उठले. तेव्हा मुलगा साहिल झोपेतून उठला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नांदेडकर यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवून आवाज दिला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी बाजूला जाऊन खिडकीतून डोकावून पाहिल्यावर साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला आणि त्यांना धक्काच बसला.

Comments
Add Comment

Domestic Violence case: 20 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; तीन दिवस अर्ध्या चपातीवर ठेवल्याचा आरोप

लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून

Sanjay Rathod : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे नियोजन; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग- मंत्री संजय राठोड

मुंबई : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

राज्यातील 3,832 अंगणवाड्या होणार स्मार्ट; मुलांना मिळणार आधुनिक शिक्षण आणि सुविधा

राज्यातील अंगणवाड्यांचं चित्र आता बदलणार आहे. अंगणवाडी केंद्रात मिळणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, आठ लाखांची फसवणूक; 13 महिलांना गंडा घालणारा आरोपी दुबईत जेरबंद!

लग्नाचे स्वप्न दाखवून महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायची, असा धक्कादायक

Pune Cyber Crime: पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक! निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एटीएस