जागावाटपावरून मविआत धुसफूस; समाजवादी पार्टीचा राज्यातील १२ जागांवर डोळा

मुंबई : विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली, त्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांच्या बैठक होत आहे. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केलं. आम्ही महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे, असं विधान त्यांनी केलं.


सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरूवारी लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना इंडिया आघाडी जोरदारपणे काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, मी उद्या महाराष्ट्रात जाणार आहे.


विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्यात आमचे दोन आमदार आहेत. आम्हाला आशा आहे की, यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही पूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू.


दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. त्यापैकी अबू आझमी हे शिवाजी नगरचे तर रईस शेख हे भिवंडीचे आमदार आहेत.


यंदा सपाचा महाराष्ट्रातील १०-१२ जागांवर डोळा आहे. यामध्ये मुस्लिम आणि युपीचे लोक मोठ्या संख्येने राहतात अशा ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, महाविकास विकास आघाडीत सपाला ३-४ जागा मिळू शकतात, अशी चर्चा आहे.



अबू आझमींचा मविआला इशारा…


महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या आघाडीत समाजवादी पक्षाचा अपमान करू नये. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र समाजवादी पक्षाला एकाच बैठकीत बोलावण्यात आले आणि केवळ १५ मिनिटे चर्चा झाली. समाजवादी पक्ष हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्याला हलक्यात घेऊ नये, जर समाजवादी पार्टीला विश्वासात घेतले नाही आणि योग्य वाटा दिला नाही तर स्वबळावर लढू, असा इशारा आझमींनी दिला.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रामध्ये पुन्हा हवामान बदल, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबई- पुण्याची स्थिती काय?

मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यातील हवामानात पुन्हा मोठे फेरबदल जाणवणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या

 Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट 2026

Pune News: "वय केवळ आकडा..." पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video

पुणे: नुकतंच आपण सर्वांनी गणरायाला जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी

दुष्काळग्रस्त तालुक्यांना सरसकट मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. हाताशी आलेलं पिक करपून जात

ST Buses : आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचणार लालपरी! दुर्गम भागासाठी 100 मिडी बसेस धावणार

मुंबई : महाराष्ट्रातील दुर्गम, डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांच्या भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिक आणि

ReelStar Divya Shinde : डॉक्टरच्या घरात घुसली आणि... रिलस्टार दिव्या शिंदेवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यात  (Pune) सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे  (Divya Shinde) हिच्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला