Radhika Apte : राधिका आपटेनं दिली ‘गोड बातमी’; फ्लॉन्ट केला बेबी बंप

बॉलीवूडमधली सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेनं (Radhika Apte)  सर्वाना गोड बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांत कलाविश्वातून अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. आता राधिका आपटेच्या घरी पालन हलणार आहे. राधिका आपटे गरोदर आहे. राधिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांना तिच्या या पोस्टने सुखद धक्का मिळाला आहे. राधिका आपटे ३९व्या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.


'बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल २०२४'(BFI London Film Festival) मधील फोटो पोस्ट करत राधिकाने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलंय. राधिकाचे या फिल्म फेस्टिव्हलमध्ये फोटो क्लिक करण्यात आले असून त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतोय.



राधिका 'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाच्या प्रिमियरदरम्यान राधिकाने आई होणार असल्याची गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. राधिका या फिल्म फेस्टिव्हलसाठी काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली. मात्र, लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे तिच्या बेबी बंपने. बेबी बंप फ्लॉन्ट करत राधिकाने रेड कार्पेटवर आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.



राधिकाने केलेल्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. २०१२ साली राधिकाने बेनेडिक्ट टेलरशी (Benedict Taylor) लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर आता १२ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.

Comments
Add Comment

Hemant Dhome Post: नवरा असावा तर असा! पत्नीसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट; करीनाच्या चित्रपटातील कामावर अभिनेता फिदा

मुंबई: 'रश्मी रॉकेट' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती

Gondhal Marathi Movie : ना कट, ना ब्रेक… तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन! ‘गोंधळ’मधील या सीनने वेधलं सगळ्यांचं लक्ष

महाराष्ट्राच्या मातीतील ‘गोंधळ’ची ऑस्करवारी चांगलीच गाजतेय! मुंबई : महाराष्ट्राची परंपरा, मानवी नात्यांतील

Spy Thriller Series : एक कम्प्युटर कोड अन् देशाला धोका! ‘धुरंधर’नंतर ओटीटीवरील ही एमी विजेती सीरिज तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल

मुंबई : धुरंधरमधला थरार, गुप्त मिशन्स आणि शत्रूविरोधात खेळले जाणारे बौद्धिक खेळ आवडले असतील, तर ओटीटीवरील

Gondhal Movie: लग्नाची रात्र, गूढ रहस्य अन् जुनं वैर! Oscar 2027 च्या शर्यतीत गेलेल्या ‘गोंधळ’च्या कथेत नेमकं काय?

मुंबई: ९९ व्या अकादमी पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ऑस्कर २०२७ मध्ये 'गोंधळ' या मराठी चित्रपटाला

Dashmi Marathi Movie : रुपेरी पडद्यावर पुन्हा उमलणार बाप-लेकीचं भावनिक नातं! मकरंद अनासपुरे-गौरी इंगवलेचा 'दशमी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘दे धक्का 2’मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर! मुंबई : बाप-लेकीचं नातं, मुलीच्या स्वप्नांसाठी वडिलांची

अभिमानास्पद! Oscar 2027 च्या शर्यतीत मराठी चित्रपटाची निवड

मुंबई: मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी अभिमानाची बातमी समोर येत आहे. २०२५ मध्ये रिलीज झालेला संतोष डावखर दिग्दर्शित