Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश' या चित्रपटाच्या पुनरागमनाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. आता 'क्रिश 4' चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे, या मोठ्या प्रोजेक्टसाठी 'रामायण'चे निर्माते नमित मल्होत्रा यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. जर नमित या चित्रपटात सामील झाले, तर क्रिशचे जग पूर्वीपेक्षा अधिक भव्य प्रमाणात सादर केले जाऊ शकते. या चित्रपटाचे बजेट सुमारे 700 ते 800 कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे.
रामायणच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर, हृतिक रोशनने 'क्रिश 4' ला रामायणासारखेच भव्य बनवण्याच्या उद्देशाने निर्माता नमित मल्होत्रा यांची भेट घेतली असावी अश्या जोरदार चर्चा सुरू आहेत. चाहते बऱ्याच काळापासून हृतिक रोशनला चित्रपटांमध्ये पाहण्याची वाट पाहत आहेत. 'जेलर 2' मधील त्याच्या प्रभावी कॅमिओनंतर तो सर्वत्र दिसू लागला. हृतिकचा आता पुढचा प्रोजेक्ट कोणता आहे आणि तो सध्या कशावर काम करत आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.
Kartik Aaryan Upcoming Movie: कार्तिक आर्यन बनला निर्माता! वाढदिवशी 'कालिया'ची घोषणा, करण जोहरसोबत नवा प्रोजेक्ट
Kartik Aaryan Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 36 वा वाढदिवस आज, 22 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या खास प्रसंगी कार्तिकने चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज ...
नमित मल्होत्रा यांची क्रिश 4 साठी जोरदार चर्चा
बॉलिवूडच्या सुपरहिरो क्रिशचे पुनरागमन यावेळी आणखी भव्य असणार आहे. डेक्कन क्रॉनिकलमधील एका वृत्तानुसार, हृतिक रोशन या चित्रपटासाठी 'रामायण'चे निर्माते नमित मल्होत्रा यांच्याशी चर्चा करत आहे. त्यामुळे नमित या प्रोजेक्टमध्ये सामील होऊन चित्रपटाच्या भव्यतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
'क्रिश 4' हा चित्रपट सुमारे 700-800 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला जाऊ शकतो. मात्र, निर्मात्यांकडून बजेटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नमित मल्होत्रा यांना मोठ्या बजेटच्या चित्रपटांचा अनुभव आहे. त्यांनी अलीकडेच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट 'रामायण' सादर करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. तसेच नमित मल्होत्रा हे मोठ्या बजेटच्या चित्रपटांमधील आणि व्हिज्युअल इफेक्ट्समधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. ते ऑस्कर-विजेत्या व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ DNEG चे सीईओ देखील आहेत. त्यांच्या सहभागामुळे चित्रपटाचे व्हिज्युअल्स आणि व्हीएफएक्स हॉलिवूडच्या दर्जापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
मात्र, नमित मल्होत्रा 'क्रिश 4' मध्ये सामील झाल्याच्या बातमीला कोणीही अधिकृतपणे दुजोरा देऊ शकत नाही. हृतिक रोशन किंवा त्याचे वडील, राकेश रोशन, यांच्याकडून अधिकृत निवेदन आल्यावरच या बातम्या खऱ्या समजल्या जातील. नमितच्या DNEG या कंपनीने यापूर्वी हृतिक रोशन सोबत 'फायटर' या चित्रपटावर काम केले आहे. त्या चित्रपटाचे व्हीएफएक्स (VFX) देखील केले होते.
'क्रिश 4' च्या नव्या कथानकामध्ये मल्टीव्हर्स आणि टाइम ट्रॅव्हलसारख्या नवीन संकल्पना दिसण्याची शक्यता आहे. हृतिक रोशन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, असे अभिनेत्याच्या वडिलांनी म्हणजेच राकेश रोशन यांनी आधीच दिली आहे. त्यांनी जाहीर केल्यानुसार, तो केवळ क्रिशच्या भूमिकेत परत येणार नाही, तर चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. यापूर्वी, त्यांच्या वडिलांनी 'क्रिश' मालिकेचे दिग्दर्शन केले होते.