भारताचे ५१ व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्नांची नियुक्ती, राष्ट्रपतींसमोर घेतली शपथ

Chief Justice of India Sanjiv Khanna : न्यायाधीश संजीव खन्ना यांनी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आज संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश पदाचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून खन्ना यांनी कार्यभार स्वीकारला आहे. अनेक ऐतिहासिक खटल्यांचा निकाल संजीव खन्ना यांनी दिला आहे. कलम ३७० रद्द करणे, इलेक्टोरल बॉण्ड रद्द करणे अशा अनेक महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे ते सदस्य होते.



संजीव खन्ना हे नवे सरन्यायाधीश


भारताचे नवे सरन्यायधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यंत असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान २६ एप्रिल रोजी त्यांनी VVPAT आणि EVM यांच्यातील मतांची १०० टक्के जुळवाजुळव करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यासोबतच संजीव खन्ना यांनीच इलेक्टोरल बाँण्ड असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला होता. तसेच संजीव खन्ना यांनी मुख्य न्यायाधीश कार्यालयाला माहिती अधिकारात आणण्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून जानेवारी २०१९ मध्ये त्यांना बढती मिळाली.





संजीव खन्ना यांनी दिल्लीच्या मॉडर्न स्कूल आणि सेंट स्टिफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे. त्यांनी १९८३  साली तीस हजारी कोर्टात वकिलीला सुरुवात केली होती. 2005 साली ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जानेवारी २०१९  मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली.


Comments
Add Comment

Bullet Train News : बुलेट ट्रेन प्रकल्पाची मोठी झेप : साबरमती नदीवर उभारला ४८० मीटर लांब अन् ३६ मीटर उंच भव्य पूल

अहमदाबाद : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahemdabad Bullet Train)  प्रकल्पाच्या कामाला वेगाने गती मिळत असून, या

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मोठं यश; साबरमती नदीवरील 12 मजली उंचीचा पूल तयार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अहमदाबादमधील साबरमती नदीवर

Vivo V80 Phone: 7200mAh दमदार बॅटरी, 144Hz डिस्प्लेसह विवोचा नवा 5G फोन येतोय; भारतात केव्हा लाँच होणार?

मुंबई: जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर, थांबा... Vivo कंपनीकडून V सीरीजमधील एक नवा कोरा मोबाईल लाँच

कर्तव्य, धैर्य अन् त्याग! फ्लायदुबई घटनेनंतर उजळल्या नीरजा भानोत यांच्या शौर्याच्या आठवणी

बुधवारी (३० सप्टेंबर २०२६) फ्लायदुबई FZ1073 विमानात झालेला थरार कोणीही विसरू शकत नाही. विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार

Flydubai Incident : ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या अन्....स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, हादरवणारी माहिती समोर

Flydubai Incident : दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

नवी दिल्ली: इस्त्राईल- तेल अवीवला घेऊन जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर