JEE Main 2027 : Session 1 साठी नोंदणी उद्या संपणार; चुकवू नका ही शेवटची संधी

JEE Main 2027 Session 1 परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे. NTA ने अर्ज प्रक्रिया, लेट फी विंडो, करेक्शन विंडो आणि परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

JEE Main 2027 Session 1 परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत उद्या, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) ही माहिती दिली आहे. आतापर्यंत एकूण १३,२९,६७० अर्ज सादर झाले असून, त्यापैकी ११,१९,०६२ उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा शुल्क भरलं आहे. ज्या उमेदवारांनी अजून अर्ज भरला नाही, त्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाऊन अर्ज भरावा. मुदत संपल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.


लेट फीने अर्ज करण्याची संधी


नियमित मुदतीत अर्ज भरायचा राहिलेल्या उमेदवारांसाठी NTA ने लेट फी विंडोची सुविधा दिली आहे. ही विंडो २३ ते २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. यामध्ये अतिरिक्त शुल्क भरून अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करेक्शन विंडो उघडली जाणार आहे. या विंडोमध्ये उमेदवारांना आपल्या अर्जातील चुकांची दुरुस्ती करता येणार आहे.






अर्ज कसा भरायचा?


स्टेप १ : अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जा.
स्टेप २ : होमपेजवर "Online Application Form for JEE Main 2027 - Session 1" या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३ : आवश्यक माहिती वापरून नोंदणी पूर्ण करा.
स्टेप ४ : अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करून शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा.
स्टेप ५ : फोटो आणि सही यासारखी आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
स्टेप ६ : शेवटी परीक्षा शुल्क भरून अर्ज सबमिट करा. कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करून जपून ठेवा.


महत्त्वाच्या तारखा


सिटी इंटिमेशन स्लिप : ३० डिसेंबर २०२६
अॅडमिट कार्ड : १३ जानेवारी २०२७
परीक्षा तारीख : २०, २१, २२, २३, २४ आणि २८ जानेवारी २०२७


JEE Main 2027 परीक्षा १३ भाषांमध्ये होणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JEE Main ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच अर्ज भरण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

Comments
Add Comment

घरात बनवलेले नूडल्स ठरले जीवघेणे; 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण गंभीर

घरात बनवलेल्या नूडल्सने एका कुटुंबाचा घास घेतला आहे. नूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तिची

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; सुरत-बिलीमोरा मार्गावर वीज यंत्रणा सुरू

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडलं आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल

Haridwar Firing News : हरिद्वार हादरले! गुप्तचर विभागाच्या पोलीस अधीक्षकांवर चालकाचा गोळीबार; एम्समध्ये उपचार सुरू, आरोपी अटकेत

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार शहरात शनिवारी एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना घडली आहे. आपल्याच

बर्ड फ्लूवरील स्वदेशी लस बाजारात ! लसीची किंमत ऐकून व्हाल थक्क , अवघ्या...

देशातील पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोंबड्यांमध्ये वेगाने

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; सर्व 14 आरोपींवर आरोप निश्चित

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात दिल्लीच्या फास्ट-ट्रॅक कोर्टाने शनिवारी (21 नोव्हेंबर) मोठा निर्णय दिला. सर्व 14 आरोपींवर

'काश्मीर खोऱ्यात एकही स्थानिक दहशतवादी सक्रिय नाही'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा दावा

पुलवामामध्ये पोलिसांनी लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणताही स्थानिक दहशतवादी