PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात बिघाड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे विमान शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे देवघर एअरपोर्टवर बराच वेळ थांबले होते. यामुळे एअर ट्रॅफिकवरही परिणाम झाला. मोदी जमुईतील चाकईमध्ये सभा करून परतत होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान उड्डाण होऊ शकले नाही. यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक झाली, परिणामी इतर उडाणांवरही याचा परिणाम झाला.


राहुल गांधी यांचे चॉपरही एक तासांपर्यंत अडकून राहिले


दरम्यान, गोड्डातील महागामा येथे निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे चॉपरही एक तासांपर्यंत अडकून राहिले. एअर ट्रॅफिक ब्लॉकमुळे त्यांचे चॉपरही जवळपास २ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण करू शकले.


मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे चॉपरही बऱ्याच वेळ अडकून पडले


याशिवाय, झारखंडमधील दुमका येथेही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे चॉपरही बऱ्याच वेळ अडकून पडले होते. या सर्व घटनांमगचे कारण म्हणजे, पंतप्रधानांचे विमान देवघर विमानतळावर उभे होते. यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक करण्यात आले होते.



पंकजा मुंडेंचे हेलिकॉप्टर भरकटले


भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची शुक्रवारी सकाळी नाशिक शहरातील पश्चिम मतदारसंघातील सिडको येथे जाहीर सभा होती. त्यानंतर त्या निफाड तालुक्यात सायखेडा येथे दुपारी सभा घेणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टरच्या पायलटकडून चुकीचा रूट टाकला गेल्याने मुंडे यांचे हेलिकॉप्टर नाशिकऐवजी थेट सायखेड्याला गेले आणि गोंधळ उडाला. सिडकोतील संभाजी स्टेडियम येथे त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याने पदाधिकारी तेथेच त्यांची वाट पाहत होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत त्या सिडकोत आल्याच नाहीत. नाशिकऐवजी त्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथे हेलिकॉप्टरने पोहोचल्या. हेलिकॉप्टरच्या पायलटला सायखेडा आणि सिडको अशा दोन्ही ठिकाणांचे अक्षांश, रेखांश देण्यात आले होते. मात्र, त्याने सिडकोऐवजी पहिले सायखेड्याचे अक्षांश, रेखांश टाकल्याने हा गोंधळ झाला.

Comments
Add Comment

JEE Main 2027 : Session 1 साठी नोंदणी उद्या संपणार; चुकवू नका ही शेवटची संधी

JEE Main 2027 Session 1 परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत उद्या, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA)

घरात बनवलेले नूडल्स ठरले जीवघेणे; 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण गंभीर

घरात बनवलेल्या नूडल्सने एका कुटुंबाचा घास घेतला आहे. नूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तिची

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; सुरत-बिलीमोरा मार्गावर वीज यंत्रणा सुरू

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडलं आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल

Haridwar Firing News : हरिद्वार हादरले! गुप्तचर विभागाच्या पोलीस अधीक्षकांवर चालकाचा गोळीबार; एम्समध्ये उपचार सुरू, आरोपी अटकेत

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार शहरात शनिवारी एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना घडली आहे. आपल्याच

बर्ड फ्लूवरील स्वदेशी लस बाजारात ! लसीची किंमत ऐकून व्हाल थक्क , अवघ्या...

देशातील पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोंबड्यांमध्ये वेगाने

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; सर्व 14 आरोपींवर आरोप निश्चित

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात दिल्लीच्या फास्ट-ट्रॅक कोर्टाने शनिवारी (21 नोव्हेंबर) मोठा निर्णय दिला. सर्व 14 आरोपींवर