Lionel Messi : अर्जेंटिनाचा स्टार फुटबालपटू १४ वर्षांनंतर खेळणार भारतात!

नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा (Argentina) स्टार फुटबालपटू (Football Player) लियोनेल मेस्सी (Lionel Messi) याच्या भारतातील चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लियोनेल मेस्सी १४ वर्षानंतर भारतात खेळणार आहे. मेस्सी अखेरचा २०११ मध्ये भारतात खेळला होता. त्यावेळी कोलकाता येथील साल्ट लेक मैदानावर अर्जेंटिनाचा सामना व्हेनेझ्युएलाशी झाला होता. आता त्याच्या खेळाची जादु पुन्हा एकदा भारतात पाहायला मिळणार आहे. केरळचे क्रीडा मंत्री व्ही.अब्दुरहिमन (V. Abdurahiman) यांनी याबाबत माहिती दिली.



त्यांनी सांगितले की, दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी केरळमध्ये येईल. ते पत्रकार परिषदेत पुढे बोलताना म्हणाले की, हा सामना संपूर्णपणे राज्य सरकारच्या देखरेखीखाली होईल. या हाय-प्रोफाइल फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व आर्थिक साहाय्य राज्यातील व्यापारी करतील. या ऐतिहासिक फुटबॉल इव्हेंटचे आयोजन करण्याची क्षमता केरळकडे असल्याचा विश्वासही क्रीडा मंत्री व्ही.अब्दुरहिमन यांनी व्यक्त केला.



१३ वर्षांपूर्वी खेळला शेवटचा सामना


मेस्सी शेवटचा सामना २०११ मध्ये भारतात खेळला होता. कोलकाता येथील सॉल्ट लेक मैदानावर अर्जेंटिना विरुद्ध व्हेनेझ्युएला यांच्यात झालेला आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला होता. भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असला तरी जागतिक फुटबॉल आयकॉन मेस्सीचा भारतात मोठा चाहता वर्ग आहे. विशेषतः केरळमध्ये फुटबॉल हा फार पूर्वीपासून लोकप्रिय खेळ राहिला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; सुरत-बिलीमोरा मार्गावर वीज यंत्रणा सुरू

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडलं आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल

Haridwar Firing News : हरिद्वार हादरले! गुप्तचर विभागाच्या पोलीस अधीक्षकांवर चालकाचा गोळीबार; एम्समध्ये उपचार सुरू, आरोपी अटकेत

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार शहरात शनिवारी एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना घडली आहे. आपल्याच

बर्ड फ्लूवरील स्वदेशी लस बाजारात ! लसीची किंमत ऐकून व्हाल थक्क , अवघ्या...

देशातील पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोंबड्यांमध्ये वेगाने

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; सर्व 14 आरोपींवर आरोप निश्चित

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात दिल्लीच्या फास्ट-ट्रॅक कोर्टाने शनिवारी (21 नोव्हेंबर) मोठा निर्णय दिला. सर्व 14 आरोपींवर

'काश्मीर खोऱ्यात एकही स्थानिक दहशतवादी सक्रिय नाही'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा दावा

पुलवामामध्ये पोलिसांनी लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणताही स्थानिक दहशतवादी

Narendra Modi attack on Congress : “काँग्रेसने फक्त ‘गरिबी हटाव’चा जप केला, आम्ही १२ वर्षांत ५० कोटींना गरिबीतून बाहेर काढले”; वैशालीतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी बिहारमधील वैशाली जिल्ह्यात आयोजित जाहीर सभेतून काँग्रेसच्या