११ कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एकाला अटक; ३३ डेबिट कार्ड, १२ चेकबुक जप्त

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ वर्षीय निवृत्त व्यक्तीची ११ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली. गुन्ह्यांतील ४४ लाख रुपये आरोपींकडे डेबिटकार्ड असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपीकडून ३३ डेबिटकार्ड व १२ चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस तपास करत आहेत.


कुलाबा येथे वास्तव्यास असलेले ७५ वर्षीय तक्रारदार शिप कॅप्टन म्हणून १९८५ मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत काम केले. तेथून ते ऑपरेशन मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांना अनया स्मिथ नावाच्या महिलेने एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले होते. त्यांनी देशातील मोठ्या ब्रोकिंग कंपनीच्या नावाने हा ग्रुप तयार केला होता. या कंपनीमार्फत गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल, असे आमिष तक्रारदाराला दाखवण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन त्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.


महिलेच्या सांगण्यावरून तक्रारदाराने २२ व्यवहारांद्वारे ११ कोटी १६ लाख ६१ हजार रुपये विविध खात्यात जमा केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रक्कम जमा झालेल्या एका बँक खात्यातून ६ लाख रुपये एका महिलेने काढल्याचे निष्पन्न झाले. यावेळी महिलेने दिलेल्या केवायसीच्या माध्यमातून पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी तिने आरोपी कैफ इब्राहिम मन्सुरी (३२) याच्या सांगण्यावरून रक्कम काढल्याचे महिलेने सांगितले. आरोपी कैफ हा मोहम्मद अली रोड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीकडून ३३ डेबिट कार्ड व १२ चेकबुक जप्त करण्यात आले. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पाच डेबिटकार्डच्या बँक खात्यावर या गुन्ह्यांतील ४४ लाख रुपये आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

पवई तलावावर साकारलंय देशातील सर्वात भव्य म्युझिकल फाउंटन, लाईट अँड साउंड शोमधून उलगडणार मराठ्यांच्या शौर्यगाथा!

मुंबई: मुंबईतील पर्यटनामध्ये भर घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य

उंबरमाळी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, चालक-वाहकाच्या तत्परतेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक

मुंबई: मध्य रेल्वेवरील मुंबई मंडळाच्या कसारा स्थानकावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्यामुळे

Chembur Accident: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

मुंबई : चेंबूर येथील रहेजा अक्रोपोलिस गृहसंकुलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अ‍ॅडोनिस इमारतीमध्ये लोखंडी

देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या हायमास्ट कंत्राटावर संशयाची सुई, BMC पालिका प्रशासनाकडून तपासणीचे आश्वासन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): देवनार डम्पिंग ग्राऊंडवर रात्रीच्या वेळी कचऱ्याचे ढिग लावण्याचे काम हाती घेतले जात

पीपीपी अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या रुग्ण खाटांवर मुंबई महापालिकेचे बोधचिन्ह लावा, स्थायी समितीत कंत्राटदाराला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यासाठी

महापालिका निधीचा अपव्यय रोखणार, लवकरच आयुक्तांसह सर्व गटनेत्यांची होणार बैठक