मुंबई : चेंबूर येथील रहेजा अक्रोपोलिस गृहसंकुलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अॅडोनिस इमारतीमध्ये लोखंडी गेट कोसळून एका 46 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. मृत सुरक्षा रक्षकाचे नाव सुनील कुमार पितरदेव गुप्ता असे असून, ते इमारतीमध्ये सुरक्षेची जबाबदारी पार पाडत होते. मात्र कर्तव्यावर असतानाच गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. ऑन ड्युटी ते इमारतीचे गेट उघडण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी अचानक गेट तुटून त्यांच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली.
सदर घटनेनंतर त्यांना तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. गुप्ता हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, गेल्या काही वर्षांपासून संबंधित गृहसंकुलात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. ते मानखुर्द येथे पत्नीसमवेत राहत होते. त्यांची पत्नी घरकाम व स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.
Kartiki Ekadashi 2026: ‘बळीराजाला संकटात वाऱ्यावर सोडणार नाही’; विठुरायाच्या चरणी शिंदेंचे साकडे
पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल ...
या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन पाहणी केली. मृत व्यक्तीची आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शिवाय, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत आहे. गेटच्या देखभालीची जबाबदारी गृहसंकुल व्यवस्थापनाची होती का, तसेच या दुर्घटनेमध्ये कोणाचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
Kartiki Ekadashi 2026: ‘बळीराजाला संकटात वाऱ्यावर सोडणार नाही’; विठुरायाच्या चरणी शिंदेंचे साकडे
पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल ...