कोलाजसाप्ताहिक
काव्यरंग : ऋतु हिरवा ऋतु बरवा
December 8, 2024 01:15 AM
ऋतु हिरवा ऋतु बरवा
पाचूचा वनि रुजवा
युगविरही हृदयावर सरसरतो मधूशिरवा
भिजुनी उन्हे चमचमती
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण
प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा
गीत - शांता शेळके
स्वर - आशा भोसले
मेंदीच्या पानांवर
मेंदीच्या पानांवर मन अजून झुलतेऽ गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलतेऽ गं
झुळझुळतो अंगणात तोच गार वाराऽ गं
हुळहुळतो तुळशीचा अजून देह साराऽ गं
अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळेऽ गं
अजून तुझ्या डोळ्यांतील मोठेपण कवळेऽ गं
गीत - सुरेश भट
स्वर - लता मंगेशकर
कोलाज
August 30, 2026 03:00 AM
भास्कर खंडागळे
नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा
कोलाज
August 30, 2026 02:45 AM
अनिल रा. तोरणे
आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन
कोलाज
August 30, 2026 02:30 AM
डॉ. स्वाती गानू
दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं
कोलाज
August 30, 2026 02:15 AM
श्रीनिवास बेलसरे
ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना
कोलाज
August 30, 2026 02:00 AM
निशा वर्तक
भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या
कोलाज
August 30, 2026 01:45 AM
भालचंद्र ठोंबरे
निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व