Shirdi Sai Temple : थ्रीडी स्कॅनिंग डाटा संरक्षण; २० डिसेंबर रोजी साई मंदिर राहणार पावणेतीन तास बंद

शिर्डी : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील साईबाबांची संगमरवरी (इटालियन मार्बल) मूर्तीचा पुरातत्व विभागाकडून थ्रीडी स्कॅनिंग डाटा संरक्षित करण्यासाठी दर्शनात तात्पुरता बदल करण्यात आला असून शुक्रवार दि २० डिसेंबर रोजी पावणेतीन तास साई मंदिर बंद असणार असल्याची माहिती संस्थान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरातील इटालियन मार्बल असलेली श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुवार दि. ७ ऑक्टोबर १९५४ रोजी करण्यात आली असून या घटनेला आजरोजी ७० वर्ष पूर्ण झाली आहे.साई मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीवर नित्यानेमाने होणाऱ्या पूजा अर्चा दुग्धभिषेक यामुळे भविष्यात मूर्तीची झिज होऊ शकते. मात्र अद्यापपर्यंत मूर्तिकार तालीम यांनी तयार केलेल्या श्री साईबाबांच्या मूर्तिमध्ये काहीच फरक पडलेला नाही.



तरीही कुठे इजा किंवा असा प्रसंग उद्भवल्यास या थ्रीडी स्कॅनवरून मूर्तिचे संवर्धन करू शकतो.म्हणून श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्री साईबाबांच्या संगमरवरी (इटालीयन मार्बल) मूर्तीची थ्रीडी स्‍कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करणेकामी (पुरातत्व विभाग) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांनी सुचित केल्याप्रमाणे स्‍थापन करणेत आलेल्या विविध तज्ञ समिती मधील सदस्य दि.२० डिसेंबर रोजी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देवून पाहणी करणार आहेत. त्यामुळे दि.२० रोजी दुपारी १.४५ ते ४.३० या पाऊण तासाच्या दरम्यान साई समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.


याची सर्व भाविक भक्‍तांनी नोंद घ्यावी व त्यानुसार आपली यात्रा योजना आखावी असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले असून याकामी साईभक्तांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नाशिक महापालिकेचा थकबाकीदारांना दिलासा ! मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीत मिळणार सवलत, 1 डिसेंबरपासून अभय योजना

नाशिक : मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नाशिककरांसाठी महापालिकेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. थकीत मालमत्ता

Nashik : नाशिकमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर रडारची नजर ! 7 महिन्यांत 39 हजार वाहनांवर कारवाई

नाशिक : रस्त्यावरून वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्टकडे दुर्लक्ष करणे आता वाहनचालकांना

Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! भुसावळमार्गे धावणाऱ्या नऊ एक्सप्रेसचे मार्ग बदलले

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागातील

Jalgaon Crime : जळगावात लग्नमंडपात रक्ताचा थरार ! 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Jalgaon Crime : लग्नसोहळ्यातील आनंदाचे वातावरण क्षणात शोककळेत बदलले. जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसमारंभात

Nashik : "...और एक वकालतनामा रेडी रख" ; 'त्या' ऑडिओ क्लिपमुळे नाशिक TCS प्रकरणात ट्विस्ट ! इम्तियाज जलील यांची आज न्यायालयात हजेरी

नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील तरुणीवरील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांच्या प्रकरणात तपासाला आता

नाशिककरांच्या आवडत्या ‘सायंतारा’वर FDA ची कारवाई, नोंदणी प्रमाणपत्रही निलंबित

नाशिक : नाशिकच्या प्रसिद्ध सायंतारा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याची