Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! भुसावळमार्गे धावणाऱ्या नऊ एक्सप्रेसचे मार्ग बदलले

झाशी रेल्वे स्थानकावरील कामामुळे संबंधित एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट बुकिंग करण्यापूर्वी तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीचा मार्ग आणि वेळापत्रक तपासून घ्यावे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागातील वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन स्थानकावर फलाट क्रमांक एकवर बॅलेस्टलेस ट्रॅक उभारणीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात धावणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे आणि वलसाडकडे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.



झाशी रेल्वे स्थानकावर नेमकं काय काम होणार ?


वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन हे धौलपूर-बिना रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर बॅलेस्टलेस ट्रॅकची उभारणी करण्यात येणार आहे. रेल्वे मार्गाचे आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने काही एक्सप्रेस गाड्या पर्यायी मार्गाने चालवण्यात येणार आहेत.






कोणत्या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले ?


१. माँ बेल्हा देवी धाम प्रतापगड-LTT एक्सप्रेस (१२१७४) - २४ नोव्हेंबर ते २९ डिसेंबरदरम्यान ही गाडी कानपूर, हमीरपूर रोड, जबलपूर आणि इटारसी मार्गे धावणार आहे.


२. सीतापूर-LTT एक्सप्रेस (१२१०८) - २२ नोव्हेंबर ते २७ डिसेंबरदरम्यान या गाडीचा मार्ग बदलण्यात आला असून, ती कानपूर, हमीरपूर रोड, जबलपूर आणि इटारसीमार्गे धावेल.


३. छपरा-LTT एक्सप्रेस (२२५८३) - २४ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान ही गाडी गोविंदपुरी, कानपूर, हमीरपूर रोड, जबलपूर आणि इटारसी मार्गे वळवण्यात आली आहे.


४. पुणे-लखनऊ एक्सप्रेस (११४०७) - २४ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत ही गाडी इटारसी, जबलपूर, हमीरपूर रोड आणि कानपूरमार्गे लखनऊला पोहोचणार आहे.


५. हजरत निजामुद्दीन-भुसावळ एक्सप्रेस (१२४०६) - २० नोव्हेंबर ते २७ डिसेंबरदरम्यान या गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे. ही गाडी मथुरा, बयाना, सोगरिया आणि बिना मार्गे भुसावळला पोहोचेल.


६. बरेली-LTT एक्सप्रेस (१४३१४) - २१ नोव्हेंबर ते २६ डिसेंबरदरम्यान ही गाडी ग्वाल्हेर, गुना आणि बिना मार्गे धावणार आहे.


७. LTT-अयोध्या कॅन्ट एक्सप्रेस (२२१२९) - २१ नोव्हेंबर ते २७ डिसेंबरदरम्यान ही गाडी ललितपूर, खजुराहो आणि महोबा या पर्यायी मार्गाने धावणार आहे.


८. अयोध्या कॅन्ट-LTT एक्सप्रेस (२२१३०) - या गाडीचाही २१ नोव्हेंबर ते २७ डिसेंबरदरम्यान मार्ग बदलण्यात आला असून, ती महोबा, खजुराहो आणि ललितपूरमार्गे धावेल.


९. कानपूर-वलसाड एक्सप्रेस (१२९४४) - २० नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान ही गाडी कानपूर, प्रयागराज, माणिकपूर, जबलपूर आणि इटारसी मार्गे वलसाडला पोहोचणार आहे.



प्रवासापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा


झाशी रेल्वे स्थानकावरील कामामुळे संबंधित एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट बुकिंग करण्यापूर्वी तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीचा मार्ग आणि वेळापत्रक तपासून घ्यावे. यासाठी भारतीय रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Prahaar Marathi News Live, 19 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 19 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Mumbai Water Metro Project : मुंबई वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन सल्लागार कंपन्यांची नियुक्ती

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करून प्रवाशांना जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून

अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई; 1.27 कोटींचा अन्नसाठा जप्त, 12 परवाने निलंबित व 6 व्यवसाय बंद

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर बडगा उगारला

Chandrashekhar Bawankule : ओबीसी कल्याणासाठी 6,840 कोटींच्या निधीची शिफारस; जानेवारीत राज्यभर 500 विशेष शिबिरे

मुंबई : राज्यातील ओबीसी आणि 18 पगड जातींच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांचा विकास होणार; 18 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाची जैन तीर्थक्षेत्रं असलेल्या बाहुबली आणि कुंथुगिरी यांच्या सर्वांगीण

Eknath Shinde : दुर्धर आजारांवरील उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळावेत, तसेच महागड्या उपचारांचा