मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील परप्रांतीय अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली : मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील परप्रांतीय अखिलेश शुक्ला अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून या मारहाण प्रकरणी इतर दोन जणांना देखील ताब्यात घेतले असून याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची एसीपीमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.


कल्याणच्या योगीधाममधील मराठी कुटुंबाच्या मारहाण प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटल्यानंतर पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून यातील मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. या घटनेत मारहाण झालेल्या देशमुख कुटुंबीयांचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार असल्याचेही झेंडे यांनी यावेळी सांगितले.



याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून अन्याय वागणूक देण्यात आल्याचा आरोप नागरिकांच्या शिष्टमंडळाने केला आहे. त्याची दखल घेत कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहितीही यावेळी डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली. तसेच या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही झेंडे यांनी दिला आहे.


शुक्ला हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींना अटक करण्याचे काम सुरू असून ८ ते १० जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असल्याचे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अ‍ॅमस्टरडॅमच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अ‍ॅमस्टरडॅम नगरीच्‍या महापौर फेम्के हलसेमा यांनी आज,

भांडुप संकुलातील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कामाला गती; अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भांडुप नवीन जलशुद्धीकरण

Andheri Kurla Road : अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार, तब्बल १३.४० मीटर रुंदीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुंबई

Mumbai Tunnel Project : मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘पाताळ लोक’चा उतारा!

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता जमिनीखालून रस्त्यांचे जाळे

Mumbai Railway News: मध्य रेल्वेचा कसारा मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक; लोकलसह मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मध्य रेल्वेने कसारा येथे 21 आणि 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय

Dadar Metro Station : दादर मेट्रो स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार, रेल्वे स्थानकाचे नामकरण नाही; प्रसिद्धीपत्रकातील गोंधळामुळे संभ्रम

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेला संभ्रम