भांडुप संकुलातील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कामाला गती; अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबईची दीर्घकालीन जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी भांडुप संकुलात 2,000 दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि नवीन जल उदंचन केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळाची पाहणी करून 31 मे 2027 पर्यंत उर्वरित खोदकाम पूर्ण करण्यासह सर्व कामे वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भांडुप नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आणि नवीन जल उदंचन केंद्र हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांशी संबंधित सर्व स्थापत्य, विद्युत, यांत्रिक तसेच जलशुद्धीकरण प्रक्रियाविषयक कामे निर्धारित वेळापत्रकानुसार वेगाने पूर्ण करावीत. विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वय राखून प्रभावी नियोजन, कामांचा नियमित आढावा आणि अंमलबजावणीतील अडथळ्यांचे तातडीने निराकरण करावे. तसेच, प्रकल्प निर्धारित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि प्राधान्याने प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.


मुंबई महानगराचा पाणीपुरवठा अव्‍याहतपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्‍याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. तसेच, नवीन 2 हजार दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्रातून येणारे पाणी महासंतुलक जलाशयात पोहोचविण्‍यासाठी 2 हजार दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे नवीन जल उदंचन केंद्रही उभारण्‍यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या प्रकल्पस्थळास भेट देऊन पाहणी केली. त्‍यावेळी त्‍यांनी विविध निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) श्री. चंद्रकांत चौधरी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.



भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल हे आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या प्रकल्‍पाची एकत्रित पाणी शुद्धीकरणाची क्षमता प्रतिदिन 2,810 दशलक्ष लीटर इतकी आहे. भांडुप येथे सुमारे 1,910 दशलक्ष लीटर आणि 900 दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करू शकणारी दोन युनिट्स आहेत. पाणीपुरवठ्याची मागणी वाढत असल्‍याने भांडुप संकुल येथे 2000 दशलक्ष लीटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्‍यात येत आहे. त्‍यात हरिणीकरन संपर्क टाकी, पाण्यातील गढूळपणा, सूक्ष्म घनकण व अशुद्धी वेगळे करण्याची जाणारी प्रगत जल शुद्धीकरण प्रक्रिया, जल प्रवाह दोन किंवा अधिक दिशांना अथवा विविध प्रक्रिया टाक्यांमध्ये समान प्रमाणात विभागून देणारी प्रवाह विभाजक यंत्रणा , द्विस्तरीय माध्यम गाळणी, प्रतिप्रवाह धुलाई यंत्रणा , अ‍ॅक्टिडायन प्रक्रिया , सांडपाणी उपसा यंत्रणा आदींचा प्रामुख्‍याने समावेश आहे.






सद्यस्थितीत सुमारे 6 हेक्‍टर जागेवर 16 मीटर खोलवर खोदकाम झाले आहे. खोदकामातून निर्माण होणा-या राडारोड्याची विनिनिर्दिष्‍ट स्‍थळी वाहतूक करण्‍यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या सर्व बाबींची सविस्‍तर माहिती घेतली. दिनांक 31 मे 2027 पर्यंत उर्वरित खोदकाम पूर्ण करावे, खोदकाम, राडारोड्याची वाहतूक यांचे नियोजन करावे. त्‍याबरोबरच सिमेंट काँक्रीट , विद्युतीकरण, सीमाभिंत आदींचे काम समांतरपणे पूर्ण करावे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून प्रकल्प कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले.


नवीन जल उदंचन केंद्र उभारण्‍याकामी खोदकाम वेगाने सुरू आहे. जमिनीपासून 20.5 मीटर खोलीपैकी 18 मीटर खोलवर खोदकाम झाले आहे. पर्यायी जलवाहिनी , उर्ध्व दाब जलवाहिनी आणि पंप हाऊस इमारतीसाठी आवश्‍यक खोदकाम 100 टक्‍के पूर्ण झाले आहे. जल प्रवेशिका चेंबर आणि शुद्ध जल उपसा टाकी यांच्‍यासाठी सुमारे 85 टक्‍के खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, 179 सूक्ष्म स्‍तंभांचे काँक्रीटीकरण कामेही पूर्ण झाले आहे. त्‍यांचा सविस्‍तर आढावा घेत बांगर म्‍हणाले की, कामे आव्‍हानात्‍मक असली तरी वेळापत्रक निश्चित करून संपूर्ण कामे पूर्णत्‍वास न्‍यावीत. स्‍थापत्‍य कामांबराेबरच विद्युतीकरणाची कामे समांतरपणे हाती घ्‍यावीत. त्‍यासाठी विविध टप्‍पे निश्चित करावेत. मनुष्यबळाची कुमक वाढवावी.

Comments
Add Comment

Andheri Kurla Road : अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार, तब्बल १३.४० मीटर रुंदीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुंबई

Mumbai Tunnel Project : मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘पाताळ लोक’चा उतारा!

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता जमिनीखालून रस्त्यांचे जाळे

Mumbai Railway News: मध्य रेल्वेचा कसारा मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक; लोकलसह मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मध्य रेल्वेने कसारा येथे 21 आणि 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय

Dadar Metro Station : दादर मेट्रो स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार, रेल्वे स्थानकाचे नामकरण नाही; प्रसिद्धीपत्रकातील गोंधळामुळे संभ्रम

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेला संभ्रम

Mumbai Political News: 'बाळासाहेबांचा अपमान ते काँग्रेसशी युती'; उबाठाच्या स्वाभिमानावर जोरदार सवाल!

Mumbai Political News: हिंदुह्रदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणताही शिवसैनिक कधीच सहन करणार नाही, हे

Police Bharti 2026: पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! राज्यभरातील मैदाने सरावासाठी विनामूल्य

मुंबई: राज्यात पोलीस भरतीची तयारी करणारे लाखो तरुण आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पोलिस