Oops! मांजाने कापला मुलाचा कान

नाशिक : नायलॉन मांजाने दुचाकीस्‍वाराचा गळा चिरल्याची घटना ताजी असतानाच आता या घातक नायलॉन मांजाने एका बालकाचा कान कापल्याची (Oops) धक्कादायक घटना येवल्यात घडली आहे.


चिनी व नायलॉनच्या मांजावर बंदी घातलेली असतानाही त्याचा राज्यात सर्रासपणे वापर सुरू आहे. सध्या मकरसंक्रांतीचा सण जवळ येत आहे. त्यानिमित्त पतंगबाजीला सर्वत्र उधाण आले आहे. पतंगांचा खेळ पक्ष्यांप्रमाणे मानवासाठीही जीवघेणा ठरू लागला आहे. त्यासाठी प्रतिबंध असलेल्या नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू असून, याचा वापर घातक आहे.


या मांजामुळे शहरात दुर्घटना घडल्याचे प्रकार याआधीही घडले होते. तरीही या मांजाची विक्री आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर पोलीस व महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. मांजामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला असून, या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.



येवला शहर व परिसरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असून, निमगाव मढ येथे तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या मनीषा इघवे या मुलगा सार्थक (वय ७) याला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घेऊन जात होत्या. यावेळी शहरातील फत्तेबुरुज नाका परिसरात सार्थकच्या डोक्यात मांजा अडकल्याने त्याचा कान कापला गेला. त्याला जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले असून कानाला झालेली जखम मोठी असल्याने १२ टाके पडले असल्याची माहिती डॉ. स्वप्निल शहा दिली.


या घटनेनंतर नायलॉन मांजावरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी प्रशासन केव्हा करणार, असा प्रश्न परिसरातीन नागरिकांनी उपस्थित केला आहे.


नायलॉन मांजाने दुचाकीस्‍वाराचा गळा चिरला; विक्रेत्‍यावर कारवाई


याआधी दोन डिसेंबर रोजी यवतमाळमधील भोसा परिसरात दुचाकीने शेतात जात असलेल्या प्रशांत रामचंद्र राऊत यांचा मांजामुळे गळा चिरल्याची घटना घडली. सुदैवाने यात दुचाकीस्वाराचा जीव वाचला. यानंतर नायलॉन मांज्‍या विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली.


दरम्यान, दरवर्षीच असे अपघात घडत असतात. त्यानंतरही स्थानिक नगरपालिका प्रशासन, पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा पथक कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. आतापर्यंत एकही कारवाई पोलिसांनी केली नाही. बंद असलेला मांजा विक्री होत असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येते. शहरात अशी घटना घडली की मग कारवाईचा देखावा दरवर्षी केला जातो.

Comments
Add Comment

'सत्तेसाठी बाळासाहेबांचा वापर'; उद्धव ठाकरेंवर आनंद परांजपे यांचा हल्लाबोल

ठाणे:  मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत युती केल्याबद्दल उद्धव

K3G 25 Years: K3G ला २५ वर्षे! मुंबईत उभी राहणार रायचंदांची हवेली; चाहत्यांना मिळणार खास अनुभव

K3G 25 Years: प्रत्येक सिनेरसिकाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या 'कभी खुशी कभी गम' च्या रायचंद कुटुंबाला 25 वर्ष पूर्ण झाले

Mumbai Political News: 'बाळासाहेबांचा अपमान ते काँग्रेसशी युती'; उबाठाच्या स्वाभिमानावर जोरदार सवाल!

Mumbai Political News: हिंदुह्रदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणताही शिवसैनिक कधीच सहन करणार नाही, हे

Police Bharti 2026: पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! राज्यभरातील मैदाने सरावासाठी विनामूल्य

मुंबई: राज्यात पोलीस भरतीची तयारी करणारे लाखो तरुण आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पोलिस

ठाणे-भिवंडी-कल्याणकरांची प्रतीक्षा संपणार? कशेळी डेपोत Metro 5 ची पहिली मेट्रो दाखल, वाचा मोठी अपडेट!

ठाणे: मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी ठाणे-

मुंबईतील 'मिनी वाराणसी'मध्ये देव दिवाळीच्या दिवशी भव्य महाआरतीचे आयोजन, महाआरतीने उजळणार परिसर!

मुंबई: दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या ऐतिहासिक बाणगंगा तलाव पुन्हा एकदा भक्तीच्या रंगात न्हाऊन