ठाणे: मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो मार्गिका 5 आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या मार्गिकेसाठी उभारण्यात येत असलेल्या एमएमआरडीएच्या (MMRDA) कशेळी डेपोमध्ये पहिली मेट्रो ट्रेन दाखल झाल्याने प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पहिल्या गाडीच्या आगमनामुळे मेट्रोच्या गाड्यांची तपासणी, चाचणी आणि नियमित देखभालीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची तयारी सुरू झाली आहे.
खासगी टँकरच्या पाण्याचे दर ठरवा, GPS ट्रॅकिंग सक्तीचे करा; निरंजन डावखरे यांची मागणी
शहरात सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी टँकरचालकांकडून ...
कशेळी येथील हा डेपो मेट्रो मार्गिका 5 साठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या ठिकाणी मेट्रो गाड्या सुरक्षितपणे उभ्या करणे, तसेच त्यांची नियमित तपासणी, चाचणी आणि दुरुस्ती करण्याची सोय असणार आहे. मेट्रोचे डबे डेपोत आणण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेला डबा चढविण्याचा आणि उतरविण्याचा मंच उभारण्यात आला आहे. यासोबतच तात्पुरती तपासणी सुविधाही तयार करण्यात आली असून, या सर्व बाबींमुळे तांत्रिक कामकाजाला चालना मिळणार असल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हा डेपो सुमारे 27 हेक्टर क्षेत्रावर साकारला जात असून, त्याची क्षमता लक्षणीय आहे. कशेळी डेपोमध्ये एकाच वेळी सुमारे 30 मेट्रो गाड्यांचे संच ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी येथे पाच तपासणी मार्गिका, चार दुरुस्ती कार्यशाळा मार्गिका, स्वतंत्र चाचणी मार्ग आणि मेट्रो गाड्या धुण्यासाठी विशेष सुविधा उभारण्यात येणार आहेत. या आधुनिक सुविधांमुळे गाड्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करणे अधिक सोपे व प्रभावी होणार आहे. कशेळी डेपोत पहिली मेट्रो ट्रेन दाखल होणे हा मार्गिका 5 च्या उभारणीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Thane News : कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरकरांनो काळजी घ्या! 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 24 तास पाणीपुरवठा बंद
ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) बारवी जलशुद्धीकरण प्रकल्पातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 24 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा ...
मेट्रोच्या आगमनानंतर चाचणी आणि तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच, डेपोचे उर्वरित कामही वेगाने सुरू आहे, अशी माहिती एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या दाट लोकवस्तीच्या व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या पट्ट्यांना जोडणाऱ्या या मार्गिकेच्या कामातील प्रगतीकडे आता लाखो प्रवाशांचे लक्ष लागले आहे. कशेळी डेपोतील वाढत्या हालचालींमुळे या मेट्रो मार्गिकेच्या दिशेने पडलेले हे पाऊल प्रवाशांच्या अपेक्षा उंचावणारे ठरत आहे.