Thane Hordings : ठाणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवरून उच्च न्यायालयाचे पालिकेवर ताशेरे

ठाणे : ठाणे शहरातील भल्यामोठ्या ४९ अनधिकृत होर्डिंगवर कागदोपत्री कारवाईचा दिखावा करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने फटकारले. तसेच पालिकेला शपथपत्र सादर करण्यास सांगून ठोस कारवाईचे आदेश दिलेत. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली होती. मात्र ठाणे महापालिकेने किती फलकांवर काय कारवाई केली याबाबत संदिग्धता होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा-माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी माहिती घेतली व त्यात धक्कादायक माहिती उघडकीस आली. ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही गेली अनेक वर्षे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या होर्डिंग व्यवसायिकांसह, चुकीचा स्थळ पाहणी अहवाल देणाऱ्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून वकील सागर जोशी यांच्यामार्फत संदीप पाचंगे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत महापालिकेची बाजू मांडणारे वकील मंदार लिमये यांना कोर्टाने खडेबोल सुनावले.




महापालिकेने ११ कोटी रूपयांचा दंड ४९ जाहिरात फलक कंपन्यांना ठोठावला होता तसेच वसूल करायला ७ दिवसांची वेळ दिली होती मात्र महापालिका राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. अनधिकृत ४९ होर्डिंगवर काय कारवाई केली, याची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, फलकांचा वाढीव आकार कमी करण्याचे आदेश देण्याशिवाय महापालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. काही जाहिरात कंपन्यांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन करून भलेमोठे फलक लावण्यात आले आहेत. महापालिका अकार्यक्षम आहे किंवा होर्डींग व्यवसायात भागीदार आहे असे कडक ताशेरे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ओढले. कोर्टाने आता संपूर्ण ठाणे शहरातील जाहिरात फलकांबाबत काय कारवाई करणार आहात याचे शपथपत्र पुढील तारखे आधी देण्यास सांगितले आहे.


Comments
Add Comment

राज्य शासनाकडून सिनेरसिकांसाठी मराठी चित्रपटांची मेजवाणी, ‘चित्रपताका– 2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित

सायबर सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा पुढाकार; 16 आणि 17 नोव्हेंबरला नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषद

नवी दिल्ली: वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालणे, डिजिटल तपास यंत्रणा सक्षम करणे आणि देशाचे डिजिटल भविष्य अधिक

'पंचायत'च्या पाचव्या सीझनच्या रिलीजबद्दल मेकर्सकडून महत्त्वाची अपडेट; म्हणाले, "सीरीजचा आगामी सीझन यावर्षी..."

मुंबई: ओटीटीप्रेमी गेल्या अनेक वर्षभरापासून 'पंचायत' वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते,

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी

राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील दारात आता आरोग्यसेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी

'देशाला बदनाम करून सत्ता मिळणार नाही!' भारताच्या बदनामीवरून अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा!

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री