मुंबई: ओटीटीप्रेमी गेल्या अनेक वर्षभरापासून 'पंचायत' वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांना 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 'पंचायत'वेबसीरिजचा पाचवा सीझन 2026 या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार अशी चर्चा होत असताना, अखेर निर्मात्यांकडून चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित 'पंचायत' वेबसीरिजचा पाचवा सीझन 2026 मध्ये रिलीज होणार नाही. चाहत्यांना 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. काही तासांपूर्वीच 'पंचायत'च्या मेकर्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही महत्त्वाची अपडेट दिली आहे. ह्या अपडेटमुळे 'पंचायत' वेबसीरिजचे चाहते नक्कीच नाराज झाले आहेत.
Jhimma3: नव्या वर्षात 'झिम्मा ३'चा धमाका! हेमंत ढोमे पुन्हा घेऊन येणार मैत्रीचा भन्नाट प्रवास, प्रदर्शनाची तारीख ठरली
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत अनेक वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, मैत्री, नातेसंबंध, महिला सक्षमीकरण ...
प्राईम व्हिडिओने काही तासांपूर्वी एक फोटो शेअर केलेला आहे. या फोटोवर निर्मात्यांनी लिहिले की, "2026 या वर्षी 'पंचायत'चा पाचवा सीझन रिलीज होणार नाही", असं लिहिलं आहे. ही पोस्ट शेअर करताना कॅप्शन दिले की, "दुर्दैवाने, 'पंचायत'चा आगामी सीझन अजुनही पुर्णपणे गुपित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." मेकर्सच्या ह्या निर्णयामुळे चाहत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पंचायत वेबसीरिजमधील कॅरेक्टरच्या शैलीमध्ये चाहत्यांकडून विरोध केला जात आहे. या बहुप्रतिक्षित वेबसीरिजचा पुढचा सीझन 2027 मध्ये केव्हा रिलीज होणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन प्राईम व्हिडिओवरील, 'पंचायत'वेबसीरिजने केलं आहे. 'पंचायत' वेबसीरिजचे आतापर्यंत चार सीझन रिलीज झाले आहेत. या सीरिजचा शेवटचा एपिसोड जून 2025 मध्ये रिलीज झाला होता. एक वर्ष झालं असून आता चाहत्यांमध्ये आगामी एपिसोडची चर्चा आहे. येत्या आगामी सीझनमध्ये फुलेरा गावाचा पुढचा प्रधान कोण होणार? सचिव आणि रिंकीची लव्हस्टोरी कोणतं वळण घेते? प्रधानजीचा मुख्य मारेकरी कोण? यासह अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना 'पंचायत'च्या पाचव्या सीझनमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चाहत्यांमध्ये या सीरिजबद्दल उत्सुकता कायम आहे. 'पंचायत'च्या पाचव्या सीझनची रिलीज डेट मेकर्स केव्हापर्यंत रिलीज करणार या प्रतिक्षेत सध्या चाहते आहेत.
Sonakshi Sinha Case: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण न्यायालयाने का केले मुक्त?
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल ...