IND vs AUS : जयस्वालच्या अर्धशतकानंतरही मेलबर्न कसोटी ऑस्ट्रेलियाच्या हाती

मेलबर्न : बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेतील चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसअखेर कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे पूर्ण नियंत्रण असल्याचे चित्र आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात रडतखडत झाली. भारताने दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद १६४ धावा केल्या. अद्याप भारत ३१० धावांनी पिछाडीवर आहे. यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकी खेळीनंतरही मेलबर्न कसोटीत भारतापुढील आव्हानं कमी झाल्याचे दिसत नाही.



सलामीवीर यशस्वी जयस्वालने ११८ चेंडूत एक षटकार आणि अकरा चौकारांच्या जोरावर ८२ धावा केल्या. तो धावचीत झाला. कर्णधार रोहित शर्मा फक्त तीन धावा करून झेलबाद झाला. केएल राहुल २४ धावा करून त्रिफळाचीत झाला. विराट कोहली ३६ धावा करून झेलबाद झाला. आकाश दीप तर शून्य धावांवरच झेलबाद होऊन परतला. रिषभ पंत सहा आणि रविंद्र जाडेजा चार धावांवर खेळत आहे. अवांतर नऊ मिळाल्यामुळे भारताने पाच बाद १६४ धावा एवढी मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड आणि कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

बघा : झोपण्यापूर्वी मध खाण्याचे फायदे


बॉर्डर - गावसकर ट्रॉफी (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  1. पहिली कसोटी, पर्थ - भारताचा २९५ धावांनी विजय

  2. दुसरी कसोटी, अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय

  3. तिसरी कसोटी, ब्रिस्बेन - सामना अनिर्णित

  4. चौथी कसोटी, मेलबर्न - खेळ सुरू आहे

  5. पाचवी कसोटी, सिडनी - खेळ ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार

Comments
Add Comment

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरूवात, जाणून भारताचा सामना कधी आणि पूर्ण शेड्यूल

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होत असून एकूण 8 संघ

IND vs NZ 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बसवण्याचा निर्णय योग्यच! प्रशिक्षकांनी दिलं असं कारण

भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पकड मिळवली. पण त्यानंतर ही पकड

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम; माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत!

[caption id="attachment_1076800" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा मैदानात

IND vs NZ 1st Test: पंतची झेल घेण्यासाठी धाव आणि देवदत्त पडिक्कल कन्फ्यूज, झेल सुटला आणि गिलचा पारा चढला Video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने सरशी घेतली. मात्र

IND vs NZ 1st Test: टीम इंडियाची चांगली सुरूवात, पण सहाव्या विकेटने केली गडबड; पहिल्या दिवशी असं घडलं

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे सुरू आहे. या सामन्यात

IPL 2027: महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडला होणार फायदा? कसं काय ते समजून घ्या

[caption id="attachment_1076673" align="aligncenter" width="800"] महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर मागच्या तीन पर्वापासून नेतृत्वाची जबाबदारी