युक्रेनविरोधात रशियाकडून लढलेले १६ भारतीय बेपत्ता, १२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : युक्रेनविरोधात रशियाकडून लढलेल्या १२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. याच लढाईत रशियाकडून सहभागी झालेले १६ भारतीय बेपत्ता आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. परदेशातली नोकरी आणि जास्त पैसे मिळतील असा विचार करुन रशियाच्या सैन्यात वेगवेगळ्या पदांवर नोकरीसाठी गेलेले भारतीय आता परत येऊ इच्छितात. पण या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. या प्रकाराविषयी भारत सरकारने नाराजी जाहीर केली आहे. तसेच रशियाच्या सैन्यातील परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना तातडीने मायदेशी परतण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.



रशिया - युक्रेन युद्धात ३२ वर्षांच्या बिनिल टी बी याचा मृत्यू झाला तर त्याचा नातलग असलेला जैन टी के गंभीर जखमी आहे. या संदर्भातले वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले. या वृत्ताची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दखल घेतली आहे. रशियाच्या सैन्यातील मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना त्यासाठीची परवानगी द्यावी, अशी मागणी भारत सरकारने केली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या १२६ भारतीयांपैकी ९६ मायदेशी परतले आहेत. सध्या १८ भारतीय रशियाच्या सैन्यात आहेत. या व्यतिरिक्त रशियाच्या सैन्यात असलेले पण सध्या बेपत्ता असलेले असे १६ भारतीय आहेत. या भारतीयांचा शोध घ्यावा अशी मागणी भारताने रशियाकडे केली आहे.

बिनिल टी बी याच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. या दुःखद घटनेविषयी शोक व्यक्त करत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जैन टी के याच्यावर मॉस्कोतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले. तब्येत सुधारल्यावर जैन टी के मायदेशी परतेल, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
Comments
Add Comment

26 अब्ज किमी दूर पोहोचला व्हॉयजर-1! 49 वर्षे वीज कुठून मिळते? NASA च्या यानाने रचले इतिहासातील अनेक विक्रम

अंतराळ विश्वातून एक ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. NASA चे व्हॉयजर-1 हे अंतराळयान पृथ्वीपासून तब्बल 26 अब्ज किलोमीटर

सौदीच्या हवाई हल्ल्यात हूतींचे 60 लष्करी तळ उद्ध्वस्त, 17 जणांचा मृत्यू; कुवेतवरील ड्रोन हल्ल्याने मध्य पूर्वमध्ये प्रचंड खळबळ

मध्य पूर्व आशियात पुन्हा एकदा युद्धाचा वणवा भडकला असून, परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. इराण समर्थित हूती

Multibagger Stock : एका दिवसात 233% झेप! या फार्मा शेअरने गुंतवणूकदारांना दिला छप्परफाड परतावा

एखादा स्टॉक कधी आश्चर्यकारक कामगिरी करून गुंतवणूकदारांना श्रीमंत करेल आणि दुसरा कधी त्यांना कंगाल करेल, याचा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी एजंटला अमेरिकेत तब्बल 27 वर्षांची कठोर शिक्षा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेतील बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्येचा भयंकर कट

महाविनाश उंबरठ्यावर? अमेरिका-इराण युद्ध भडकले, मध्य पूर्व पुन्हा एकदा रक्तरंजित होण्याच्या मार्गावर!

मध्य पूर्व आशियात सध्या युद्धाची नवी आणि भयानक लाट उसळली आहे. बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर इराणचे सडासड

iPhone युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! Apple ची सेवा ठप्प, कोणकोणत्या देशांना बसला फटका?

मुंबई: अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून टेक्नोलॉजी संबंधित नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत