मंदिरांच्या बळकावलेल्या जमिनी वाचविण्यासाठी ‘ॲन्टी लॅन्ड ग्रॅबिंग’कायदा करावा!

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मुंबई निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांना निवेदन

मुंबई : राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. महाराष्ट्रात 'लॅन्ड ग्रॅबरां'ना, म्हणजेच जमिनी हडपणाऱ्यांविरोधात कायदेशीर फौजदारी स्वरूपाची शिक्षा होण्यासाठी सक्षम कायदा नसल्याने बिनधास्तपणे देवस्थानांच्या शेतजमिनी हडपल्या जात आहेत. यामध्ये भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. या गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने 'ॲन्टी लॅन्ड ग्रॅबिंग (प्रतिबंध)' कायदा करून कारवाई करावी, तसेच राज्यात जमिनी हडपण्याविरोधी विशेष पथकाची नेमणूक करावी, या मागण्या महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.


सदर विषयाचे निवेदन मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हादंडाधिकारी जयराज कारभारी यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. या वेळी निवेदन देताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक सुभाष अहिर, रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, मानव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे रमेश घाटकर, गंधर्व ठोंबरे, अधिवक्ता अनिश परळकर, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सदस्य रविंद्र दासारी, हिंदुत्वनिष्ठ अनिल सिंग, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संघटक प्रसाद मानकर आदी उपस्थित होते.



महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये देवस्थानांचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. देवस्थानांना प्रदान करण्यात आलेल्या शेतजमिनी फक्त पूजा-अर्चा, देवाची सेवा कार्य व इतर धार्मिक प्रयोजनांसाठी प्रदान करण्यात आलेल्या आहेत. अशा जमिनी पुजारी, सेवाधारी, विश्वस्त किंवा इतर त्रयस्थ व्यक्तींच्या नावे करता येत नाहीत, याबाबत विविध उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालयांचे निवाडे झाले आहेत. असे असताना, महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी महसूल विभागाच्या संगनमताने देवस्थानांच्या जमिनी हडपण्याचे गैरप्रकार वाढलेले आहेत, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


गुजरात, ओडिशा, कर्नाटक, आसाम आदी राज्यांमध्ये ज्या प्रकारे मंदिरांच्या शेतजमिनी बळकावण्याच्या विरोधात कठोर ‘ॲन्टी लॅन्ड ग्रॅबिंग ॲक्ट’ तयार करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही असा कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. देवस्थान किंवा देवस्थान शेतजमिनींबाबत कोणत्याही प्रकारची निर्णयप्रक्रिया राबवताना सदर प्रक्रियेत महाराष्ट्र मंदिर महासंघाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्य सरकारकडे विनंती केली आहे.

Comments
Add Comment

Railway News : मुंबई ते सहरसादरम्यान 2 अतिरिक्त विशेष रेल्वे; 19 नोव्हेंबरला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार

मुंबई: सण-उत्सवांच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक

दादर रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच ‘चैत्यभूमी’ होणार! विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या

Mumbai News : ChatGPT वापरून लोकलचा पास बनवला बनावट! महिनाभर AC लोकलमध्ये प्रवास, अखेर टीसींनी पकडले

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर अनेक कामांसाठी केला जात असताना, त्याचा गैरवापर करून रेल्वेची

Western Express Highway Bike Stunt: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जीवघेणे बाईक स्टंट; व्हायरल व्हिडिओनंतर 5 तरुणांना अटक!

Western Express Highway Bike Stunt: महाराष्ट्रातील मुंबई शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही बाईकस्वार धोकादायक स्टंट करतांना आणि

मुंबईत चाहत्याला ऑटोग्राफ देण्यास केट मिडलटन यांचा नकार; नेमकं कारण काय?

प्रिन्स विल्यमसोबत केट मिडलटन मुंबईत दाखल झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने

अमिताभ बच्चन यांना धमकी देणाऱ्या गँगस्टरची लॉरेन्स टोळीकडूनच पोलखोल! ‘तो तर भांडी घासणारा भुरटा चोर’, अंडरवर्ल्डमध्ये मोठा भडका!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर गँगस्टर गोल्डी ढिल्लन सध्या चर्चेत आला आहे.