Western Express Highway Bike Stunt: महाराष्ट्रातील मुंबई शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही बाईकस्वार धोकादायक स्टंट करतांना आणि निर्भीडपणे दुचाकी चालवताना एक व्हिडिओ शोषलं मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओतील 5 मुलांवर पोलिसांनी कारवाई करत त्यानां अटक केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक कसरती करताना दिसले. ज्यामुळे रस्त्यावरील इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. हे बाईकस्वार भरधाव वेगाने गाडी चालवत होते, धोकादायक स्टंट करत होते आणि गोंधळ घालत होते. त्यांच्या या कृत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून मुंबई पोलिसांनी कारवाई केली. पाच तरुणांना या प्रकरणात अटक केली आहे.
Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!
'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि ...
अंधेरी पूर्व परिसरात मुंबई विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील महामार्गावर काही तरुण धोकादायक स्टंट करताना दिसले. बेदरकारपणे दुचाकी चालवताना हे बाईकस्वार आढळून आले. काही बाईकस्वारांकडे हेल्मेट किंवा नंबर प्लेट नव्हती, तर काहींच्या गाड्यांना मोठा आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर होते. हे तरुण स्टंटबाजी आणि रेसिंगचे व्हिडिओ बनवून इन्स्टाग्राम व फेसबुकवर रील्सच्या माध्यमातून व्हायरल करत असल्याचे समोर आले. सोशल मीडियावरील व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला.
यासंदर्भात अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची चौकशी केली. त्यात दिसलेल्या बाईकस्वारांना ओळखले. त्यानंतर, पाच तरुणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच मोटरसायकलही जप्त केल्या, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
जावेद रफिक मालदार (25), मोहसीन मुबारक शेख (19), फैजान अहमद खान (22), साहिल मोहम्मद सिराज (29) आणि कुशल दत्ताराम भिसे (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या संदर्भात पुढील तपास सध्या सुरू आहे.