Ajit Pawar : लाडक्या बहीणींसाठी ‘महिला व बाल विकास’कडे ३,७०० कोटींचा चेक जमा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती


मुंबई : लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार, याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागली होती. तसेच योजनेबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. योजनेसाठी निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात, अशीही चर्चा मध्यंतरी होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते योजना बंद करतील, असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला. पण माझ्याकडे अर्थ खाते आहे. आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत. पण योजनेतल्या त्रुटी असतील त्या आम्ही काढू. जी भगिनी खुरपणीला जाते, धुणी-भांडी करते, जी अतिशय गरीब कुटुंबातून आली आहे. जिला १५०० रुपयांचे महत्त्व समजते, तिलाच योजनेचा लाभ दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.



अजित पवार पुढे म्हणाले, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे. म्हणजे महिन्याला २१ हजारांच्या आत वेतन असलेल्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत. आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आवाहन आहे की, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे, त्यांनी गरीब महिलांकरिता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान सोडले होते. तशाच प्रकारे आताही केले जावे. पण परवाच महिला व बाल विकास खात्याकडे ३,७०० कोटींचा चेक दिला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Railway News : मुंबई ते सहरसादरम्यान 2 अतिरिक्त विशेष रेल्वे; 19 नोव्हेंबरला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार

मुंबई: सण-उत्सवांच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक

दादर रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच ‘चैत्यभूमी’ होणार! विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या

Mumbai News : ChatGPT वापरून लोकलचा पास बनवला बनावट! महिनाभर AC लोकलमध्ये प्रवास, अखेर टीसींनी पकडले

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर अनेक कामांसाठी केला जात असताना, त्याचा गैरवापर करून रेल्वेची

Western Express Highway Bike Stunt: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जीवघेणे बाईक स्टंट; व्हायरल व्हिडिओनंतर 5 तरुणांना अटक!

Western Express Highway Bike Stunt: महाराष्ट्रातील मुंबई शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही बाईकस्वार धोकादायक स्टंट करतांना आणि

मुंबईत चाहत्याला ऑटोग्राफ देण्यास केट मिडलटन यांचा नकार; नेमकं कारण काय?

प्रिन्स विल्यमसोबत केट मिडलटन मुंबईत दाखल झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने

अमिताभ बच्चन यांना धमकी देणाऱ्या गँगस्टरची लॉरेन्स टोळीकडूनच पोलखोल! ‘तो तर भांडी घासणारा भुरटा चोर’, अंडरवर्ल्डमध्ये मोठा भडका!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर गँगस्टर गोल्डी ढिल्लन सध्या चर्चेत आला आहे.