Dr. Kisan Maharaj Sakhre Death : ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

पुणे : वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किसन महाराज साखरे यांचे सोमवारी रात्री पुण्यातील चिंचवड येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.


डॉ. साखरे यांच्या पश्चात कन्या यमुना कंकाळ आणि पुत्र यशोधन साखरे व चिदंबरेश्वर साखरे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. साखरे यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. तसेच आळंदी आणि देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची दृकश्राव्य प्रत प्रकाशित केली आणि संत साहित्याच्या प्रसारासाठी मोठे योगदान दिले.



त्यांच्या साहित्यप्रवासात त्यांनी संस्कृत व मराठीतून ११५ ग्रंथ लिहिले. यामध्ये सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद आणि सोहम योग यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांनी एकूण ५०० ताम्रपटांवर ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. २०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार प्रदान केला होता, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवीने सन्मानित केले होते.


डॉ. साखरे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली असून ही पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Latur Blast : लातूरमध्ये कुरिअरच्या टेम्पोत भीषण स्फोट; एक जण गंभीर जखमी, वाहनात बंदूक आढळल्याने खळबळ

Latur News: लातूर शहरात कुरिअरची पार्सल घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कुरिअरचे

त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ धार्मिक विधींना प्रारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत आहे.

Pune News: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! PMPML बस प्रवासात 50 टक्के सवलत; 1 नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

Pune News: पुणे,

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला बारा वर्षे पूर्ण; राजकारणातील एक तप आणि विकासाचा नवा अध्याय!

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक शपथविधीला ३१ ऑक्टोबर,

Cm Devendra Fadanvis News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! चारा परराज्यात पाठविण्यास बंदी...

मुंबई: राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून, चाऱ्याचा वापर बायोफ्युएल किंवा

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.