त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ धार्मिक विधींना प्रारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहन कार्यक्रम पार पडत आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तमध्ये, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येत आहे.

1/5 सिंहस्थ कुंभेमळ्याच्या ध्वजारोहन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुजेला सुरूवात झाली आहे. काही वेळेपूर्वीच या पूजेला सुरूवात झाली असून नाशिककर या पूजेसाठी उपस्थित आहेत.

2/5 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीर्थराज कुशावर्तावर धर्मध्वज अनावरणाआधीच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक मठाधिपती सुद्धा उपस्थित होते.

3/5 नाशिकमध्ये, 12 वर्षांनंतर एकदा कुंभमेळ्याचे पर्व सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर आज ध्वजारोहनाचा कार्यक्रम आहे. दुपारी 12.02 वाजता शुभमुहूर्तावर नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तमध्ये ध्वजारोहन करण्यात येणार आहे.

4/5 काल रात्री उशिरा मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी नाशिकमध्ये येताच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील दोन्ही ठिकाणचा आढावा घेत कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेतली. इतकंच नाही तर, इतरत्र माहिती सुद्धा त्यांनी घेतली.

5/5 त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
Comments
Add Comment

Pune News: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! PMPML बस प्रवासात 50 टक्के सवलत; 1 नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

Pune News: पुणे,

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला बारा वर्षे पूर्ण; राजकारणातील एक तप आणि विकासाचा नवा अध्याय!

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक शपथविधीला ३१ ऑक्टोबर,

Cm Devendra Fadanvis News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! चारा परराज्यात पाठविण्यास बंदी...

मुंबई: राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून, चाऱ्याचा वापर बायोफ्युएल किंवा

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित

मुंबई: दुष्काळजन्य परिस्थितीतील संभाव्य चारा टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने

PM Kisan Samman Nidhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 24 व्या हप्त्याचे वितरण; महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना'चा 24 वा हफ्ता वितरित