Chhaava : शेर शिवा छावा है वो! विकी कौशलचा अंगावर काटा आणणारा लूक रिव्हील

मुंबई : अग्नि भी वो, पाणी भी वो, तुफान भी वो, शेर शिवा छावा है वो! असं म्हणत ‘मॅडॉक फिम्स’ने ‘छावा’ या सिनेमामधली अभिनेता विकी कौशलचा टिझर प्रदर्शित करत त्यांचा लूक रिव्हील केला. बहुचर्चित छावा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचा ट्रेलर २२ तारखेला प्रदर्शित होतोय.



छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत सिंहासनावर बसलेला या पोस्टर मध्ये पाहायला मिळतो आहे.या पोस्टरने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं असून, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत.


छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.अभिनेता विकी कौशल बरोबर , रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना यांचा देखील अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


या आधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती, मात्र संपूर्ण भारतभर मोठ्या पातळीवर संभाजी महाराजांची कथा मांडण्यात दिग्दर्शक - निर्मात्यांना यश आलं नव्हतं मात्र ‘छावा’ चित्रपटाच्या टिजरला मिळालेल्या भव्य प्रतिसादामुळे हा चित्रपट मनोरंजनाच्या सर्व पातळीवर गाजण्याची शक्यता वर्तवली जातेय. या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली असून, लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे!

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’