रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी – मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

मुंबई : मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेट्टीचे काम दर्जेदार आणि सर्व सोयींनी युक्त करावे अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


बंदरे विकास मंत्री श्री राणे यांनी रेडिओ क्लब येथे उभारण्यात येणाऱ्या जेटीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. प्रदीप, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये, मुख्य अभियंता राजाराम पुरी गोसावी, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खरा, मुख्य सागरी अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता श्रीकांत बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.



रेडिओ क्लब येथील जेटी ही प्रवाशांसोबतच पर्यटनासाठी उपयुक्त असणार असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले की, या जेटीचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या लवकरात लवकर मिळवाव्यात. येथे निर्माण होणाऱ्या सोयी-सुविधा दर्जेदार असाव्यात. या नवीन जेटीमुळे सध्याच्या जेटीवरील ताण कमी होणार आहे. याचा विचार करून याचे काम करावे अशा सूचनाही श्री. राणे यांनी दिल्या.



यावेळी बंदरे विकास मंत्री श्री. राणे यांनी गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब परिसराची पाहणी केली आणि कामाची सविस्तर माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेतली.


रेडिओ क्लब येथे प्रवासी आणि पर्यटन यासाठी टर्मिनल इमारतीसह इतर सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये ८० मीटर बाय ८० मीटरचा टर्मिनल प्लॅटफॉर्म, टर्मिनल इमारत, २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद जेटी, ३५० लोकांची क्षमता असलेले अँफिथियेटर, प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, पाणपोई, अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटिव्ही यंत्रणा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Mumbai BEST Bus Fire: ससून डॉकजवळ बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने आग नियंत्रित

Mumbai BEST Bus Fire: मुंबईतील कुलाबा येथील ससून डॉकजवळ आज, बुधवार 18 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी मार्ग क्रमांक 139 च्या बेस्ट बसला आग

Mumbai Airport News: ना विमान, ना माहिती! मुंबई विमानतळावर स्पाईसजेटच्या प्रवाशांचा संताप

Mumbai Airport News: देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून

Dawood House Demolition: भेंडी बाजारातील दाऊदच्या घरावर महापालिकेची कारवाई; धोकादायक इमारत जमीनदोस्त होणार

Dawood House Demolition: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर ऐतिहासिक आणि गर्दीचा भाग म्हणून ओळखला जातो. यंत्रमाग उद्योगाची राजधानी,

BSc Nursing College: बीएससी नर्सिंग कॉलेजच्या समोर उबाठा आडवे

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील

BMC च्या मालमत्ता कर वसुलीसाठी व्हॉट्सअप आणि गुगल मेसेजचा वापर करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मालमत्ताधारकांना सुविधा देण्यासाठी

मुंबईत तात्पुरत्या अंगणवाड्यांसाठी उद्यान, मैदानांमध्ये कंटेनरची सुविधा? ठरावाच्या सूचनेद्वारे केली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक एसआरए तसेच इतर गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बालवाडीच्या जागा बाधित होत