बेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला

पालघर : २० जानेवारीपासून बेपत्ता असलेले पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह आज सापडला आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या कारच्या डिक्कीतच त्यांचा मृतदेह आढळला आहे. अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त केला जात असतानाच गाडीच्या डिक्कीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अशोक धोडींचाच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामुळे आता या तपासाला वेगळं वळण मिळालं आहे.


२० जानेवारीला संध्याकाळी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेनं गेली असल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. त्यामुळे अशोक धोंडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. तसंच संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती.



गेल्या १२ दिवसांपासून पोलीस प्रकरणाचा तपास करत असतानाच अशोक धोडी यांची कार गुजरातमध्ये सापडली. भिलाडजवळील सरिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगड खाणीत त्यांची गाडी सापडली. घटनास्थळी तातडीनं पालघर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलही स्वतः घटनास्थळी पोहोचले होते.


दरम्यान अशोक धोडी अपहरण प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी वेवजी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अविनाश धोडी यांनीच अशोक धोडी यांच अपहरण केल्याचा अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि

Nashik : सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धा : ४२ गणेश मंडळांचा सहभाग, आता देखाव्यांची प्रत्यक्ष पाहणी

Nashik : सिंहस्थ महाकुंभ मेळा २०२७च्या जनजागृतीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या

Radha Ashtami : सुख, शांती आणि समृद्धीसाठी राधा अष्टमीची पूजा कशी करावी? वाचा टप्प्याटप्प्याने संपूर्ण विधी

राधाष्टमीनिमित्त बरसाणामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी वृषभानू नंदिनी राधाराणी यांची जयंती

Nashik Ashram School News : आश्रमशाळेची दुरवस्था पाहून मंत्री संतप्त, मान्यता रद्द करण्याच्या सूचना

Nashik Ashram School News : आश्रमशाळांमधील सुविधांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि

Nashik : नागरी प्रश्नांचा आढावा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासह श्री गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पूर्वतयारीचा