"जिवंत राहायचे असेल तर..." CRPF जवानांकडून लतीफ भटला सरेंडर होण्यासाठी अखेरचं अल्टीमेटम

लष्कर-ए-तैयबाचा लष्कर कमांडर लतीफ भट याला सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सरेंडर होण्याचे आवाहन केले आहे. सरेंडर झाला तरच, त्याला जीवनदान दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई: दक्षिण जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना लष्कर-ए.तैयबाचा दहशतवादी लतीफ भटला सरेंडर (आत्मसमर्पण) होण्यासाठी सांगितले आहे. परंतु तो सरेंडर होण्यासाठी तयार दिसत नाही. सुरक्षा दलाच्या जवानांनी लतीफ भटसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला आणि त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले गेले.






लतीफ भट सध्या जंगलपोरा परिसरातील एका मशिदीत लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांकडून लतीफला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले जात आहे, सोबतच त्याच्या अंदाधुंद आणि अचूक गोळीबार करत त्याला बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला जात आहे. परंतू सुरक्षा दलाच्या जवानांकडून विशेष मेहनत घेत त्याच्यावर कारवाई केली जात आहे.राष्ट्रीय रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरने त्याला सरेंडर होण्यासाठी सांगितले असून, जर तो स्वत:हून सरेंडर झाला तर, त्याला जीवदान दिले जाईल. जर त्याला जीवनदान हवे असल्यास ही त्याच्यासाठी शेवटची संधी असेल. तथापि, लतीफ भटने, "अल्लाहशिवाय माझ्यासोबत कोणीही नाही," असे जाहीर करून आत्मसमर्पण करण्यास स्पष्टपणे नकार दिला.


 


लतीफ भटसाठी आत्मसमर्पण करण्याची ही शेवटची संधी आहे. वास्तविक पाहता, अशा कारवायांमध्ये प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन केले जाते. जेव्हा आरोपी वारंवार आत्मसमर्पण करण्यास नकार देतो, तेव्हा कारवाई सुरू केली जाते आणि गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले जाते. लतीफ भट हा कुलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे. तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. दहशतवादी उमर निसार दार याने लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट याच्यासोबत हल्ला करण्यापूर्वी अनेक भागांची रेकी केली होती, अशी माहिती मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर 2026 रोजी उमर निसार दार आणि लष्कर कमांडर लतीफ भट यांनी कुलगामच्या अनेक भागांची रेकी केली होती. रेकी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहे.






उमर निसार दार आणि लष्कर कमांडर लतीफ भट हे दोघेही सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मीर बाजार, अखरान, हब्लिश आणि किलम यांसारख्या भागांची त्यांनी रेकी केली होती. दुसऱ्या दिवशी, 11 नोव्हेंबर रोजी, या दोघांनीही अखरानमधील सीआरपीएफच्या चौकीवर अचानक हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले होते.

Comments
Add Comment

LashkarETaiba: कुलगाममध्ये पुन्हा चकमक! लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट सुरक्षा दलांच्या रडारवर

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू झाली आहे. परिसरात

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी बातमी! 22 डिसेंबरला अंतिम मतदार यादी; निवडणूक आयोगाने जाहीर केले नवे वेळापत्रक

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात (SIR-2026) भारतीय निवडणूक आयोगाने

Junior Engineer Recruitment 2026: सरकारी संस्थेत नोकरीची संधी! ८० हजारांपर्यंत पगार; असा कराल अर्ज

देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या IIT दिल्ली येथे नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. कनिष्ठ

आंध्र प्रदेशावर तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; बंगालच्या उपसागरात नेमकं काय घडतंय?

बंगालच्या उपसागरात सध्या सुरू असलेल्या हवामान बदलांनी हवामान शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही

Rafale M88 engine ecosystem India: राफेल इंजिनसाठी भारताची तयारी! फ्रान्सच्या मदतीने देशातच उभारणार M88 इकोसिस्टम

भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. राफेल लढाऊ विमानांना शक्ती

UP Election 2027 : 'अयोध्या झाली, आता मथुरेची बारी'; २०२७ च्या यूपी निवडणुकांसाठी भाजपचे श्रीकृष्णाच्या नगरीत महामंथन, बैठकीनंतर योगी दिल्लीला रवाना होणार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप)