Pune News : एका फ्लॅटमध्ये ३५० मांजरी, पशू संवर्धन विभागाने बजावली नोटीस

पुणे : हडपसरमधील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये नवव्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने फ्लॅटमध्ये ३५० मांजरी पाळल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या पशू संवर्धन विभागाने फ्लॅटच्या मालकिणीला नोटीस बजावली आहे. फ्लॅटमधील मांजरींचे ४८ तासांत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे तसेच मांजरींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक ते उपाय करावे, असेही नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे.



महिलेने मांजरींची देखभाल करण्यासाठी घरात पाच - सहा नोकरांची नेमणूक केली आहे. पण एकाच फ्लॅटमध्ये ३५० मांजरी असल्यामुळे प्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होत होती. सततच्या दुर्गंधीमुळे सोसायटीतले इतर रहिवासी पण त्रस्त झाले होते. रहिवाशांनी वारंवार विनंती करुनही महिला मांजरींची पर्यायी व्यवस्था करणे टाळ होती. अखेर रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेच्या पशू संवर्धन विभागाला माहिती दिली. यानंतर पशू संवर्धन विभागाने फ्लॅटच्या मालकिणीला नोटीस बजावली.



नोटीस बजावण्याआधी पोलिसांच्या मदतीने फ्लॅटची पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी फ्लॅटमध्ये ३५० मांजरी असल्याचे लक्षात आले. मांजरींमुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेचा सोसायटीतील इतर सदस्यांना त्रास होत असल्याचे बघून पुणे महानगरपालिकेच्या पशू संवर्धन विभागाने फ्लॅटच्या मालकिणीला नोटीस बजावली.
Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.