Prasad khandekar : प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात एकत्र

मुंबई : वडील-मुलाचे समीकरण हे नेहमीच मित्रत्वाचे असते. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात, हिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची त्यांची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत बाप-लेक एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोक खांडेकर अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.



आठ वर्षांचा इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या श्लोकने अभिनयाच्या आवडीतून या चित्रपटातील जॉनी लिव्हर पाध्ये ही भूमिका साकारली आहे. त्याची मजेशीर व्यक्तिरेखा काय धमाल उडवणार? हे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात पाहणं रंजक असणार आहे. गारठणाऱ्या थंडीत स्विमिंगपूलमध्ये शूट ते स्केटिंग वरचा सीन या सगळ्या गोष्टी श्लोकाने अतिशय सफाईदारपणे केल्याने लेकाचा अभिमान तर आहेच, पण या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हांला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं प्रसाद खांडेकर सांगतात.


नुकताच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.


धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला 'चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे.

Comments
Add Comment

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेरील गोळीबाराचा कट पोलिसानांनी उधळला; दोघांना अटक

Amitabh Bachchan News: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील 'जलसा' या निवासस्थानाबाहेर गोळीबार

Ramayana : बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’चा धुमाकूळ ! जगभरात 1,379 कोटींची कमाई, ‘धुरंधर’लाही टाकले मागे

मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी,

राज्य शासनाकडून सिनेरसिकांसाठी मराठी चित्रपटांची मेजवाणी, ‘चित्रपताका– 2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित

'पंचायत'च्या पाचव्या सीझनच्या रिलीजबद्दल मेकर्सकडून महत्त्वाची अपडेट; म्हणाले, "सीरीजचा आगामी सीझन यावर्षी..."

मुंबई: ओटीटीप्रेमी गेल्या अनेक वर्षभरापासून 'पंचायत' वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते,

Jhimma3: नव्या वर्षात 'झिम्मा ३'चा धमाका! हेमंत ढोमे पुन्हा घेऊन येणार मैत्रीचा भन्नाट प्रवास, प्रदर्शनाची तारीख ठरली

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत अनेक वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र,

Sonakshi Sinha Case: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण न्यायालयाने का केले मुक्त?

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे मॉर्फ केलेले