'प्रशांत कोरटकरला काँग्रेस नेत्याच्या घरातून अटक'

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली. कोरटकरला तेलंगणातून आणून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर केले जाईल. याआधी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. ही प्रक्रिया सुरू असतानाच कोरटकरच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे.



तेलंगणात प्रशांत कोरटकर एका काँग्रेस नेत्याच्या घरात लपला होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. काँग्रेसने प्रशांत कोरटकरला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण प्रशांत कोरटकरच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले. यामुळे तो नेमका कुठे लपला आहे, याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीआधारे पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला अटक केली आहे, असेही आमदार परिणय फुके यांनी सांगितले.

आमदार परिणय फुके यांच्या आरोपामुळे राजकारण तापले आहे. या विषयावर बोलताना काँग्रेस आमदारांनी बचावात्मक पवित्रा घेतला. परिणय फुके मुख्यमंत्री फडणवीस यांचे लाडके आमदार होण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. हा आरोप करताना वडेट्टीवार यांनी फुके यांचे आरोप फेटाळले नाही. कोरटकरला मदत केलेल्यांवर ठोस पुराव्यांच्याआधारे कारवाई करायला पाहिजे असेही वडेट्टीवार म्हणाले. पण पुरावे नसताना कोणीही प्रसिद्धीसाठी आरोप करणे योग्य नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने