पंतप्रधानही पाहणार छावा चित्रपट

संसदेत सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग होणार


नवी दिल्ली : संसदेतही छावा चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री आणि खासदारांना देखील या चित्रपटाचे निमंत्रण असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच आठवड्यात संसदेत छावा चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशात या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. या चित्रपटातील अभिनेता विकी कौशलने देखील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर हजेरी लावली आहे.


या सर्व घडामोडींच्या दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्व सदस्यांसाठी मुंबईत विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, राज्यातील आमदार देखील उपस्थित होते. यानंतर आता संसदेत देखील या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे. संसदेत छावाच्या विशेष स्क्रीनिंगच्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांनाही बोलावले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Odisha Heavy Rainfall : ओडिशात मुसळधार पावसाचा कहर; भिंती कोसळून ३ जणांचा मृत्यू, ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश

भुवनेश्वर : ओडिशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी भिंती कोसळण्याच्या

Delhi News : दोन वर्षापासून हृदयविकाराशी झुंज; 15 व्या वर्षी AIIMSमध्ये तन्वीचा मृत्यू

दिल्ली : राजस्थानातील कोटा येथील 15 वर्षीय तन्वी परियानी हिचा दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर