नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निश्चित केलेल्या जागेवर विल्हेवाट लावावी, आवश्यक त्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ चा वापर करावा. पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह वाहता राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले आहेत. त्यामुळे नाल्यातून काढलेला गाठ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले आहे.


पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई शहर भागातील वरळी येथील रेसकोर्स नाला, नेहरू विज्ञान केंद्र नाला व दादर धारावी नाला या ठिकाणांना गुरुवारी २४ एप्रिल २०२५ रोजी भेट दिली. तसेच, नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.



मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली आहे. गाळ उपसा, वजन मोजमाप, वाहतूक, विल्हेवाट यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व चित्रफीतींचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. यानिमित्ताने गाळ उपसा कामांसाठी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर होतो आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे. महानगरपालिकेने नागरिकांसाठी 'https://swd.mcgm.gov.in/wms2025' या संकेतस्थळावर छायाचित्र / चित्रफीती उपलब्ध करून दिल्या आहेत.


जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील नाल्यांमधून गाळ उपसा कामांचे तपशील पाहता येतील. कोणताही अभिप्राय, सूचना किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही भूषण गगराणी यांनी केले.
नागरिकांनी नाल्यात घनकचरा विशेषत: प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्मोकॉल आदी तरंगता कचरा टाकू नये. त्या घनकचऱ्यामुळे सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. नाल्याच्या दुतर्फा तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:च्या आणि मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता गृहित धरता प्लास्टिक तथा तरंगता कचरा हा कचराकुंडीतच टाकावा. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी किंवा अन्य नागरी वसाहतींच्या ठिकाणी महानगरपालिकेने कचरा संकलनाची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी ठरवून दिलेल्या त्या ठिकाणीच कचरा टाकला आणि नाल्यात टाकला नाही, तर त्याचेही या नालेस्वच्छता प्रयत्नांमध्ये मोठे योगदान लाभेल आणि महानगरपालिकेला मदत होईल, असेही आवाहन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत