Mohan Bhagwat: "आम्ही शेजाऱ्यांना इजा करत नाही, पण जर ते वाईट मार्गाकडे वळले तर..." जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

मुंबई: अहिंसा हा भारताचा धर्म आहे, हिंदू धर्माचे ते मुख्य तत्व आहे, यावर भर देत संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी "भारत कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा इजा करत नाही, परंतु जर वाईट कृत्य वाढले तर बचावात प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. असे जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शनिवारी वक्तव्य केले. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्येक स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी देखील या हल्ल्याविरुद्ध जोरदार निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या द हिंदू मेनिफेस्टो नामक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित करताना हे वक्तव्य केले.



काय म्हंटले मोहन भागवत?


अहिंसा हे हिंदू धर्माचे मुख्य तत्व आहे, मात्र आक्रमकांना तोंड देणे आणि विजय मिळवणे हा देखील धर्माचा एक भाग आहे.  रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता, असं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं.


"आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा त्यांना इजा पोहोचवत नाही. पण जर कोणी वाईटाकडे वळले तर दुसरा पर्याय काय आहे? प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे, आणि त्याने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे," असं देखील भागवत पुढे म्हणाले.


भागवत यांनी आपल्या भाषणात चार तत्वांवर भर दिला आहे, ते म्हणाले "सनातन धर्माची खरी समज सध्याच्या काळात महत्त्वाची आहे. हिंदू धर्म सत्य, सुचितता, करुणा आणि तपस्या या चार स्तंभांवर उभा राहिला पाहिजे. याच्या पलीकडे जाणारी प्रत्येक गोष्ट अधर्म आहे,"



हिंदू शांत बसणाऱ्यातले नाही


दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नमूद केले की हल्लेखोरांनी लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हे आपले स्वरूप नाही. द्वेष आणि शत्रुत्व आपल्या संस्कृतीचा भाग नाही. पण शांतपणे हानी सहन करणेही आपला स्वभाव नाही.


पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंटने या दहशतवादी हल्ल्याचा दावा केला आहे आणि अलिकडच्या काळातल्या सर्वात प्राणघातक घटनांपैकी एक म्हणून या हल्ल्याचे वर्णन केले जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''